Sayali Sanjeev: सायली संजीवच्या आयुष्यात पहिली पैठणी कशी आली? तिनंच सांगितला भन्नाट किस्सा..

“होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात सायली संजीवने ही आठवण सांगितली.
sayali sanjeev shared memories of her first paithani saree
sayali sanjeev shared memories of her first paithani saree sakal
Updated on

Sayali Sanjeev : लाखो तरुणांच्या मनाला भुरळ घालणारी अभिनेत्री सायली संजीव गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चेत आहे. तिचा 'हर हर महादेव' चित्रपट असो किंवा नुकताच आलेला 'गोष्ट एका पैठणीची' हा चित्रपट.. सध्या संपूर्ण वातावरण सायलीमय झाले आहे. बऱ्याच ठिकाणी ती प्रमोशनसाठी फिरताना दिसतेय. याच निमित्ताने ती 'झी' मराठी वरील 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमात आली होती. यावेळी तिने तिच्या आयुष्यात पहिली पैठणी कशी मिळाली याचा भन्नाट किस्सा सांगितला.

sayali sanjeev shared memories of her first paithani saree
Flop Movies 2022: मोठे स्टार्स, बिग बजेट तरीही फ्लॉप गेले हे चित्रपट..

‘होम मिनिस्टर’हा कार्यक्रम महाराष्ट्रातच नाही देशभरात लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाचे आणि पैठणीचे एक वेगळे नाते आहे, या कार्यक्रमात घराघरातल्या गृहलक्ष्मीचा पैठणी देऊन सन्मान केला जातो. अशातच सायलीचा 'गोष्ट एका पैठणीची' हा चित्रपट रिलीज झाला आहे. ज्याची कथा पैठणी भोवती फिरते. याच निमित्ताने सायली 'होम मिनिस्टर' मध्ये आली होती. तेव्हा तिने पैठणीची खास आठवण सांगितली.

sayali sanjeev shared memories of her first paithani saree
Sharmila Tagore Birthday: अभिनय सोडा किंवा शाळा.. देखण्या शर्मिलाला शिक्षकांनी घातली होती अट

सायली म्हणाले, 'मी आतापर्यंत एकही पैठणी विकत घेतलेली नाही. कोणतीही नाही. पण तुमचे खूप खूप आभार कारण मला पहिली पैठणी ही होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात मिळाली होती. मी कधीच संगीत खुर्ची वैगरे कार्यक्रमात भाग घेतला नव्हता. त्यात जिंकणार नाही हे मला माहितीच होते. पण झी मराठीने कलाकारांसाठी एक विशेष भाग आयोजित केला होता, डोंबिवली मध्ये .. त्यात मी संगीत खुर्ची खेळले आणि जिंकलेसुद्धा. ती माझ्या आयुष्यातील पहिली पैठणी', अशी आठवण तिने सांगितली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.