Sayali Sanjeev: सायली संजीवची राजकारणात एंट्री.. नाशिक मधून निवडणूक लढवण्याची चिन्हं?

सायली संजीवचं ट्विट आणि चर्चेला उधाण..
Sayali Sanjeev wants to become enter in politics for mla elections in future nashik
Sayali Sanjeev wants to become enter in politics for mla elections in future nashiksakal
Updated on

Sayali Sanjeev : लाखो तरुणांच्या मनाला भुरळ घालणारी अभिनेत्री सायली संजीव गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चेत आहे. तिने आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचा 'हर हर महादेव' चित्रपट असो 'गोष्ट एका पैठणीची'.. किंवा आताच आलेला 'सातारचा सलमान'.. सध्या संपूर्ण वातावरण सायलीमय झाले आहे.

सायलीच्या कामाची कायमच चर्चा होत असते पण तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही अनेक चर्चा आजवर झालेल्या आहेत. शिवाय सायली राजकारणातही सक्रिय असते. ती महराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेच्या उपाध्यक्ष पदी आहे. पण लवकरच सायली निवडणुकीत उभं राहण्याची पण चिन्हं आहेत असं दिसतंय. नुकतच एका मुलाखतीत सायली याबद्दल बोलली.

(Sayali Sanjeev wants to become enter in politics for mla elections in future nashik)

Sayali Sanjeev wants to become enter in politics for mla elections in future nashik
Ambedkar Jayanti: बा भीमा; तू होतास म्हणून आम्ही आहोत.. अभिनेता गौरव मोरेची खास पोस्ट..

एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत सायली वैयक्तिक आयुष्याविषयी बरंच काही बोलली. यावेळी र जकीय टिपणी केल्यानंतर तुला ट्रोल केलं जातं. याकडे तू कशी पाहते? असं विचारलं गेलं.

यावर सायली म्हणाली, 'आता मी एका पक्षामध्ये आहे. त्या पक्षाच्या मी पदावर आहे. तर अर्थातच त्या पक्षाची बाजू मी मांडणार. मी ज्या पक्षात आहे त्या पक्षाची बाजू मांडताना जर माझ्यावर टीका होत असेल तर ते मी स्वीकारते. ही टीका स्वीकारणं गरजेचंच आहे. संबंधित पक्षाची विचारधारा पुढे नेण्यासाठी तुम्हाला विचार मांडावे लागतात. त्यामुळे टीका होत असली तरी त्याचा मला फरक पडत नाही.'

पुढे ती म्हणाली, 'दुसऱ्या पक्षाचं एखादं काम आवडलं तर तेही मी सांगणार. पण बाजू मांडताना मी माझ्या पक्षाची मांडणार हे इतकं साधं गणित आहे. जे महाराष्ट्र, देशासाठी चांगले आहेत त्यांना चांगलं म्हणण्याचीही आपल्यामध्ये वृत्ती असावी. मीही ते फॉलो करते. पण त्यावरही टीका होते त्यासाठी धन्यवाद. कारण टीका करणारे एवढा वेळ माझ्यासाठी देत आहेत, माझ्याबाबत बोलत आहेत याचा मला आनंद आहे.'


भविष्यात नाशिकचा नगरसेवक, आमदार, खासदार या पदी आम्हाला तू दिसणार का? असाही प्रश्न सायलीला यावेळी विचारला गेला. त्यावर सायली म्हणाली, 'माहीत नाही. असेलही. कारण नक्कीच मला काम करायला आवडेल.' असं ती म्हणाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()