'बाबा, थांब ना रे तू'; वडिलांच्या निधनानंतर सायलीची भावूक पोस्ट

३० नोव्हेंबर रोजी सायलीच्या वडिलांनी घेतला जगाचा निरोप
Sayali Sanjeev with Father
Sayali Sanjeev with FatherInstagram
Updated on

अभिनेत्री सायली संजीवच्या Sayali Sanjeev वडिलांचं ३० नोव्हेंबर रोजी निधन झालं. ते ६३ वर्षांचे होते. वडिलांच्या निधनानंतर सायलीने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिली आहे. 'बाबा, थांब ना रे तू.. बाबा, जाऊ नको दूर,' अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या आहेत. सायलीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत तिच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली.

सायलीची पोस्ट-

'संजीव.. २६/०७/१९५८ - ३०/११/२०२१, तुला माहित आहे नं बाबा माझं तुझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम होतं, आहे आणि कायम असेल. या जगात सगळ्यात जास्त.. तू आयुष्य आहेस माझं. दैव होता तू, देव होता तू, खेळण्यातला माझा खेळ होता तू. शहाणी होते मी, वेडा होता तू, माझ्यासाठी कारे सारा खर्च केला तू. आज तू फेडुदे पांग हे मला, जगण्या रे मला अजूनही तूच हवा. बाबा, थांब ना रे तू.. बाबा, जाऊ नको दूर,' अशी पोस्ट सायलीने लिहिली आहे. यासोबतच तिने वडिलांसोबतचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

Sayali Sanjeev with Father
PIFF : "कलाकाराला दाद हवी असते, मला ती पुणेकरांनी दिली"; अशोक सराफ भावूक

सायलीच्या या पोस्टवर 'भावपूर्ण श्रद्धांजली', असं अभिनेता सुबोध भावेनं लिहिलं. 'यातून सावरण्याची ताकद मिळो', असं भाग्यश्री लिमयेनं लिहिलं. समीर विद्वांस, सुयश टिळक, अभिषेक देशमुख, समिधा गुरू, मयुरी देशमुख, गौतमी देशपांडे यांसारख्या कलाकारांनीही सायलीच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.