'नाचना बंद कर' म्हणत सलमान चाहत्यावर चिडला

सलमानचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
salman khan
salman khanfile view
Updated on

बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खान नेहमी चर्चेत असतो. सलमानसोबत एक फोटो किंवा सेल्फी काढण्यासाठी चाहते आतूर असतात. सलमान हा अनेकदा त्याच्या चित्रपटामुळे किंवा त्याच्या वादग्रस्त विधांनामुळे तर कधी त्याच्या चाहत्यांमुळे चर्चेत असतो. नुकताच सलमानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो त्याच्या चाहत्यावर संतापलेला दिसतोय. इंस्टाग्रामवर विरल भयानीने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, सलमान पापाराझींसाठी पोझ देत होता. तेव्हा त्याच्या एका चाहत्याने त्याच्यासोबत फोटो काढण्याची विनंती केली. त्या चाहत्याला सलमानसोबत सेल्फी घ्यायचा होता. मात्र वैतागलेला सलमान त्याच्यावर ओरडला.

"ते फोटो घेत आहेत", असं आधी सलमान चाहत्याला म्हणाला. पण चाहत्याने फोन ठेवण्यास नकार दिला. तेव्हा सलमान चिडून म्हणाला, “नाचना बंद कर (आजूबाजूला नाचणं बंद कर).” या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'इतका का माज आहे?' असं एकाने म्हटलं, तर दुसरीकडे सलमानची बाजू घेत एकाने लिहिलं, 'भाईजानने त्याला फक्त बाजूला हो एवढचं सांगितलं.'

salman khan
माधुरी दीक्षितच्या मुलाकडून कॅन्सर पीडितांसाठी मोलाचं काम; नेटकऱ्यांकडून कौतुक

सलमान सध्या बिग बॉस १४चं सूत्रसंचालन करत आहे. त्याचसोबत त्याचा आगामी चित्रपट 'अंतिम: द फायनल ट्रुथ'चं प्रमोशनसुद्धा सुरू आहे. हा चित्रपट या महिन्याच्या अखेरीस प्रदर्शित होणार आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित अंतिम या चित्रपटामध्ये सलमानसह आयुष शर्मादेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.

आर जे सिद्धार्थच्या एका मुलाखतीत महेश मांजरेकर म्हणाले, "मी आधी चित्रपटात सलमानसाठी गाणी आणि त्याच्यासोबत एक अभिनेत्री कास्ट करायचा विचार केला होता. पण नंतर सलमान म्हणाला, या चित्रपटाला गाणी आणि नायिकेची गरज नाही."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()