Seema Haidar Sachin Love Story : 'लेके अईला भऊजी पाकिस्तानी'! 'सीमा' पार करुन आली, हवाच झाली

सीमा ही काही वेडी नाही तिनं प्लॅन करुन सचिनला फसवले आहे. ती नेपाळमार्गे जर भारतात आली तर उद्या तिच्यासारखे कुणीही धाडस करु शकेल.
Seema Haidar Sachin Love Story Social Media
Seema Haidar Sachin Love Story Social Media esakal
Updated on

Seema Haidar Sachin Love Story Social Media : प्रेमासाठी वाट्टेल ते... प्रेम केलं तर कुणाला कशाला घाबरायचं, याची प्रचिती एव्हाना सीमानं दिली आहे. सीमा ही मुळची पाकिस्तानची. पण तिनं प्रेमासाठी तिचा देश सोडला आणि ती सचिनची पत्नी झाली. सचिनसाठी तिनं धर्मही सोडला. सध्या सीमाच्या नावाची जोरदार चर्चा होत आहे. यासगळ्यात तिच्यावर वेगवेगळ्या प्रकारे टीकाही केली जात आहे.

सीमा ही काही वेडी नाही तिनं प्लॅन करुन सचिनला फसवले आहे. ती नेपाळमार्गे जर भारतात आली तर उद्या तिच्यासारखे कुणीही धाडस करु शकेल. भारताच्या गुप्तहेरांना याविषयी का नाही माहिती कळली, आपलं संरक्षण खातं काय करत होतं. यासारखे अनेक प्रश्न सीमाविषयी विचारले जात आहेत. दुसरीकडे सीमा ही पाकिस्तानी गुप्तहेर असल्याचे बोलले जात आहे. यासगळ्यात सोशल मीडियावर मात्र सीमा चांगलीच लोकप्रिय झाली आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

सीमा आणि तिच्या प्रेमाच्या गोष्टीवर गाणीही व्हायरल झाले आहेत. मराठी, हिंदी आणि भोजपूरी भाषांमधील गाण्यानं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. भोजपूरी गाण्याचे बोल तर चाहत्यांना कमालीचे आवडले आहे.

त्यात लेके अईला भऊजी पाकिस्तानी गाण्यानं धुमाकूळ घातला आहे. मराठीतही सीमावर गाणं तयार करुन मेकर्सनं नेटकऱ्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे. सीमाचं खरं नाव सामिया रहमान असे असून ती गुप्तहेर असल्याचे बोलले जात आहे.

Seema Haidar Sachin Love Story Social Media
Bawaal Movie Review: दंगलच्या दिग्दर्शकाने पुन्हा मैदान मारलं, वरुण - जान्हवीचा बवाल तुम्हाला नक्कीच आवडेल

पाकिस्तानच्या सिंध भागातून आपलं घर-दार विकून सीमा हैदर भारतात आली. त्यानंतर तिने तिच्या नवऱ्याबद्दल खूप सारे दावे केले की तो तिला मारहाण करत होता. पाकिस्तानमधील महिल्यांच्या स्थितीवर देखील तिने अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

ज्या सोशल मीडियावर व्हायरलही झाल्या आहेत. सीमा हैदर आणि सचिनच्या लग्नाचे फोटो देखील समोर आले आहेत. या सर्व गोष्टींमध्ये नेपाळ केंद्रबिंदू ठरतोय. तोच नेपाळ देश, ज्या देशातून सीमा हैदर भारतात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.