आत्मभान.. सामाजिक भान!

आपण घरात-शाळेत कसे वागायचे यासाठीचे विचार आपल्याला पालक-शिक्षक वेळोवेळी सांगतात
 चांगलं-वाईट यांचं मूल्यमापन नसेल
चांगलं-वाईट यांचं मूल्यमापन नसेलsakal
Updated on

आपण घरात-शाळेत कसे वागायचे यासाठीचे विचार आपल्याला पालक-शिक्षक वेळोवेळी सांगतात, शिकवतात, बिंबवतात, कधी कधी रागावतात. पण समाजात वावरताना, परस्परांमध्ये आणि आपल्या परिसरात कोणती आचारसंहिता असावी याचं शिक्षण किंवा मार्गदर्शन केले जात नाही. दुर्दैवाने पालकांमध्येच या आचारसंहिता कमी असल्याने मुलांपर्यंत त्या पोहोचतच नाहीत. मग मुलं मोठी होता होता जे काही आणि जिथून कुठून डोळ्यासमोर दिसेल त्याचे अनुकरण करत जातात. चांगलं-वाईट यांचं मूल्यमापन नसेल तर आपल्या वागण्याचे परिणाम व त्याची जबाबदारी झटकणे 'नॉर्मल' वाटायला लागतं.

पाश्चात्य अन्न खाणे, तसे कपडे घालणे, भारताबाहेर ट्रीपा करणे व फाडफाड इंग्रजी बोलणे म्हणजे ग्लोबल सिटीझन होणे असे नाही! आपला दृष्टिकोन 'मी' आणि 'माझं' पासून विस्तृत करून सामाजिक जागरुकता वाढवणे आणि उपभोगात्मक वृत्ती सोडून म्हणजे स्वतःपुरता मर्यादित विचार न करता आजूबाजूला जो बदल आपण पाहू इच्छितो त्याचा भाग होणे हे आहे! आपण सर्व एका खूप मोठया यंत्रणेचा एक भाग आहोत आणि आपण जे काही करू त्याचा 'बिग पिक्चर'वर परिणाम होतो याचे भान कायम असावे.

Change starts with you

- पोल्युशनला नावं ठेवण्याआधी आपण त्या पोल्युशनला कॉन्ट्रीब्यूट तर करत नाही ना याचा विचार करावा.

- दुसऱ्या देशातून परतल्यावर किती अस्वच्छता आहे भारतात हे म्हणण्याआधी आपण कधीही रस्त्यावर कचरा टाकला नाहीये ना हे स्वतःला विचारावं.

- इतर देशांच्या शिस्तीबद्दल प्रशंसा करताना तुम्ही कधीच सिग्नल मोडला नाहीये ना हे आठवावं.

- मी अनेक स्त्री-पुरुषांना त्यांच्या पाळलेल्या कुत्र्याला फिरवायला घेऊन जाताना पाहिलं आहे. कुत्र्याची विष्ठा रस्त्यावर सर्रास तशीच टाकून देऊन ती न उचलता निघून जाणारी माणसं आहेत. 'माझ्या घरात घाण होत नाहीये ना, मग रस्ता किती का घाण होईना' असा विचार असेल तर आपण सुशिक्षित आहोत पण सुसंस्कृत आहोत का हा प्रश्न स्वतःला विचारावा.

- रस्त्यावर लघवी करणे किंवा लिफ्टमध्ये, पार्किंगमध्ये, सोसायटीच्या कोपऱ्यांमध्ये थुंकणे हा आपण राहतो त्या परिसराप्रती, शहराप्रती आणि देशाप्रती केलेला उद्धटपणा आहे.

- आपल्या देशाच्या राजकारणात किती करप्शन आहे अशी तक्रार करणाऱ्याने कधी कोणत्या ट्रॅफिक पोलिसांचा किंवा आपले काम पुढे सरकवायला अधिकाऱ्यांचा खिसा गरम केला नाहीये ना हे आठवावं.

- आपल्या सर्वांना आपली प्रायव्हसी महत्त्वाची असते पण दुसऱ्याच्या आयुष्यात काय चाललंय हे जाणण्याची खुमखुमी मात्र खूप असते, असं का?

जसं आपण आपल्या आईचा मान राखतो, तिची काळजी घेतो तशीच 'जननी जन्मभूमी' आपल्या देशाची का नाही घेत? दरवर्षी ५.२५ ट्रीलियन टन प्लास्टिक समुद्रात फेकलं जातं. फक्त पुण्यात दररोज १९८ टन कचरा जमा होतो.

स्व-जागरूकता विकसित करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण हेच आत्मभान सामाजिक भान उंचावेल. प्रत्येक नागरिक अशा प्रकारे रोज जगला तरंच खऱ्या अर्थाने आपण स्वतःला ग्लोबल सिटिझन म्हणू शकू! नवीन वर्षाच्या सुरुवातीला २६ जानेवारीही येत आहे, तर नुसतंच सेलिब्रेशन न करता आपण एक सुजाण नागरिक होण्याचा संकल्प करूया!

- काही बाबतीत आपण फार सेंसिटिव असतो. जसे आपली आर्थिक परिस्थिती, आजारपणं, आपलं रूप, वय इत्यादी. तसाच संवेदनशीलपणा आपणही इतरांना दाखवावा. सोशल लाईफमध्ये कितीही जवळचे व ओळखीचे मित्र-मैत्रिणी असले तरी 'काय ग किती जाड झालीएस' किंवा 'काय रे केस अगदीच पांढरे झाले की' असं असंवेदनशील (असभ्य) पणे बोलण्याने समोरचा दुखावला जातो याचे भान असावे.

- देशाची मालमत्ता, इंधन, वृक्षसंपदा, पैसा, अन्न, पाणी, वीज कोणत्याही प्रकारे वाया जाणार नाही आणि आपण त्याची नासाडी करणार नाही याची खबरदारी घ्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.