विवाहित जावेद यांच्याशी लग्नाला आईवडिलांचा होता विरोध- शबाना आझमी

जावेद अख्तर यांचं पहिलं लग्न पटकथालेखिका हनी इराणी यांच्याशी झालं होतं.
विवाहित जावेद यांच्याशी लग्नाला आईवडिलांचा होता विरोध- शबाना आझमी
Updated on

ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी Shabana Azmi यांनी १९८४ साली गीतकार जावेद अख्तर Javed Akhtar यांच्याशी लग्न केलं. जावेद अख्तर यांचं पहिलं लग्न पटकथालेखिका हनी इराणी Honey Irani यांच्यासोबत झालं होतं. जावेद आणि हनी यांचा झोया आणि फरहान ही दोन मुलं आहेत. विवाहित पुरुषाशी लग्न करण्याच्या निर्णयावरून शबाना यांना त्यावेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्या लग्नाबद्दल व्यक्त झाल्या होत्या. त्यावेळी हनी मोठ्या मनाच्या होत्या आणि त्यांनी आपल्या मुलांना माझ्याविरुद्ध अजिबात भडकावलं नव्हतं, असं त्या म्हणाल्या. ट्विक इंडिया युट्यूब चॅनेलवर Tweak India YouTube channel अभिनेत्री आणि लेखिका ट्विंकल खन्नाशी त्या बोलत होत्या. अख्तरांसोबत लग्नाला आईवडिलांचा विरोध असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

'त्यावेळी हे किती कठीण होतं', असा प्रश्न ट्विंकलने शबाना यांना विचारला होता. त्यावर त्या म्हणाल्या, "ते विवाहित होत आणि त्यांना मुलं होती, त्यामुळे त्याकाळी माझ्या लग्नाचा निर्णय पचवणं आईवडिलांसाठी खूप कठीण होतं. ती परिस्थिती खरोखरच कठीण होती आणि म्हणूनच मला वाटतं की लोकांनी काही अंदाज लावू नये. त्यांनां फक्त गॉसिपसाठी विषय मिळतो. साहजिकच लोक म्हणणार की, तुम्ही स्वत:ला स्त्रीवादी म्हणवता आणि तुम्ही अशी परिस्थिती का स्वीकारली?"

विवाहित जावेद यांच्याशी लग्नाला आईवडिलांचा होता विरोध- शबाना आझमी
माझी तुझी रेशीमगाठ: शेफालीचा पती आहे 'मुंबई इंडियन्स'चा प्रमुख व्यक्ती

पुढे त्या म्हणाल्या, "त्यावेळी माझ्याकडे पर्याय होता. मी माझा दृष्टीकोन इतरांना समजावून सांगू शकते. मी लग्नाचा निर्णय का घेतला हे इतरांना सांगू शकत होते. पण तसं केलं असतं तर चर्चांना आणखी वाव मिळाला असता आणि आणखी गॉसिप झालं असतं. त्यामुळे मी मौन बाळगणंच पसंत केलं. योग्य वेळी लोकांना कळेल आणि नेमकं तेच घडलं. ज्या काही चांगल्या गोष्टी घडल्या, त्यासाठी मी हनी यांना श्रेय देते. कारण त्या संपूर्ण प्रवासादरम्यान तिने कधीच तिच्या मुलांना माझ्याविरुद्ध भडकावलं नाही. इतकंच नव्हे तर मुलं लहान असताना तिने त्यांना आमच्यासोबत लंडनला पाठवलं होतं. त्यामुळे आमच्यात खूप चांगलं नातं निर्माण झालं होतं. याचं श्रेय हनी आणि जावेद यांना आहे. त्यांच्यामुळेच झोया आणि फरहान यांच्यासोबत माझं खूप चांगलं नातं तयार झालं."

शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांनी १९८४ साली लग्न केलं. जावेद अख्तर यांच्यासोबतच्या मैत्रीमुळे आणि दोघांचे विचार मिळतेजुळते असल्याने त्यांच्याकडे आकर्षित झाल्याचं शबाना यांनी त्यावेळी सांगितलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.