Richard Roundtree Dies: 'ब्लॅक अ‍ॅक्शन हिरो' काळाच्या पडद्याआड! रिचर्ड राउंडट्रीचे वयाच्या 81 वर्षी निधन

प्रसिद्ध अमेरिकन अभिनेता रिचर्ड राउंडट्री यांचे निधन झाले आहे.
Richard Roundtree Dies:
Richard Roundtree Dies:Esakal
Updated on

Richard Roundtree Passes Away: अमेरिकेतील फिल्म कॉरिडॉरमधून एक दुख:द बातमी समोर आली आहे. 'ब्लॅक अ‍ॅक्शन हिरो' म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेते रिचर्ड राउंडट्री यांचे निधन झाले. त्यांनी वयाच्या ८१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. Pancreatic Cancer मुळे त्याचे निधन झाल्याचे सांगितले जात आहे.

डेडलाइनच्या रिपोर्टनुसार, रिचर्ड हे कर्करोगाशी झुंज देत होते, ज्यामुळे रिचर्ड यांचे निधन झाले. या वृत्ताने संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

रिचर्डचे मॅनेजर पॅट्रिक मॅकमिनन म्हणाले की, त्यांचे कार्य आणि कारकीर्द आफ्रिकन आणि अमेरिकन चित्रपट उद्योगांसाठी एक महत्त्वपूर्ण वळण मानले जाते. चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान विसरता येणार नाही.

Richard Roundtree Dies:
Jhimma 2 Marathi Movie : दसऱ्याचा शुभमुहूर्त साधला, ‘झिम्मा 2’ नव्यानं समोर आला! पोस्टर आऊट

रिचर्ड 1971 मध्ये रिलीज झालेल्या 'शाफ्ट' चित्रपटासाठी ओळखले जात होते. या चित्रपटामुळे ते तरुण वयातच रातोरात स्टार बनले. तो अमेरिकेच्या इतिहासातील पहिला ब्लाक्सप्लॉयटेशन चित्रपट होता.

या चित्रपटात त्यांनी खासगी गुप्तहेराची भूमिका उत्तमरित्या साकारली होती. यात रिचर्डच्या पॉवरपॅक परफॉर्मन्सने लोकांची मने जिंकली. या सिनेमाच्या यशानंतर काही सिक्वेल आणि टेलिव्हिजन स्पिनऑफ बनले. त्यामुळे रिचर्डला जगभरात ओळख मिळाली.

Richard Roundtree Dies:
Kangana Ranaut: 50 वर्षाचा इतिहासाला कंगनानं दिला तडा; लवकुश रामलीलामध्ये पहिल्यांदाच महिलेने केले रावण दहन!

रिचर्ड यांना अमेरिकेचा पहिला ब्लॅक अॅक्शन हिरो म्हटले जाते. पहिला चित्रपट 'शाफ्ट'च्या सुपर यशानंतर त्याने 'शाफ्ट इन आफ्रिका', 'स्टील', 'मूव्हिंग ऑन', 'मॅन फ्रायडे' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले.

रिचर्ड यांनी दोन लग्न केली होती. त्यांनी पहिले लग्न मेरी जेनशी केले होते. हे लग्न 1963 ते 1973 इतक्या काळच टिकले.

त्यानंतर त्यांनी करिन सेरेनाशी लग्न केले. रिचर्ड यांना निकोल, टेलर, मॉर्गन आणि केली या चार मुली आहेत. त्याच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली असून चाहते त्यांना श्रद्धांजली वाहत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.