Jawan Free Ticket Offer: बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खानला त्याच्या जवान आणि पठाण या चित्रपटाने तो बादशाह असल्याचं सिद्ध केलं आहे. पठाणने हिंदी चित्रपटसृष्टीचे अनेक नवनवीन रेकॉर्ड मोडले आणि नंतर शाहरुखच्या जवानने पुन्हा सगळे रेकॉर्ड मोडले.
7 सप्टेंबर रोजी रिलिज झालेल्या या चित्रपटाने आता जगभरात 1000 कोटींचा टप्पा पार केला आहे. जवान जगभरातील हिंदी चित्रपटातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे.
जवानने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 550 कोटींहून अधिक कमाई केली आहे. आता जवान लवकरच 600 कोटींचा टप्पा पार करेल अशी आशा शाहरुखच्या चाहत्यांना आहे.
तर आता जवान चित्रपटाच्या कमाईचा आकडा आता कमी होत आहे.
चित्रपटाच्या कमाईची घट लक्षात घेता प्रेक्षकांना पुन्हा थिएटरकडे आकर्षित करण्यासाठी नवी कल्पना आणली आहे. त्यांनी चाहत्यांना एक भन्नाट ऑफर दिली आहे.
रेड चिलीज एंटरटेनमेंटने याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केला आहे. यात त्यांनी लिहिलंय की , "डबल धमाका. सिंगल दाम. आझादसोबत विक्रम राठोर सारखे... कोणीही तुमच्यासोबत जाऊ शकते. एक तिकीट खरेदी केल्यावर, दुसरे तिकीट फ्रि विनामूल्य आहे. 1 + 1 ऑफर." ... उद्यापासून. तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये - हिंदी, तमिळ आणि तेलगूमध्ये तुमच्या प्रियजनांसोबत जवान चित्रपट पाहण्याचा आनंद घ्या."
तर किंग खाननं देखील ही ऑफर सांगणारी एक पोस्ट सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली आहे.
पहिल्या आठवड्यात 'जवान'ची एकूण कमाई 389.88 कोटी रुपये होती, तर दुसऱ्या आठवड्यात 136.1 कोटींची कमाई केली होती. तिसऱ्या शुक्रवारी चित्रपटाने 7.6 कोटींची कमाई केली आहे. तर रिलिजच्या 21व्या दिवशी चित्रपटाने 5.15 करोडची कमाई केली आहे. यासोबत आत्तापर्यंत चित्रपटाने एकूण 576.23 कोटींचा टप्पा गाठला आहे.
तर दुसरीकडे बॉक्स ऑफिसवर 'द व्हॅक्सिन वॉर' आणि 'फुक्रे 3' यासारखे चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले आहेत. त्यामुळे आता जवानच्या कमाईवर याचा परिणाम होणार असल्यानं निर्मात्यांनी प्रेक्षकांना ऑफर देत कमाईत वाढ करण्याची एक शक्कल लढवली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.