शाहरुखने सांगितले होते Boycott चे फायदे; जुन्या व्हिडिओवर नेटकऱ्यांचा संताप

लोक शाहरुख खानविरोधात लिहीत आहेत
Shah Rukh Khan Latest News
Shah Rukh Khan Latest NewsShah Rukh Khan Latest News
Updated on

Shah Rukh Khan Latest News हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रेक्षक बॉलिवूड चित्रपट आणि कलाकारांमुळे नाराज आहेत. सोशल मीडियावर प्रत्येक चित्रपटावर बहिष्कार टाकण्यात येत आहे. दरम्यान, शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) जुना व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत आहे. यामध्ये शाहरुख खानने चित्रपटांवरील बहिष्काराचे (Boycott) फायदे सांगितले आहेत. भारतात खूप प्रेम मिळाल्याचे म्हटले आहे. बॉयकॉट करून जे खूश आहेत ते आमच्यामुळे खूश आहेत, असेही शाहरुख खान म्हणाला होता.

आतापर्यंत बॉयकॉटवर अनेक कलाकारांच्या नव्या-जुन्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. दरम्यान, शाहरुख खानचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये शाहरुख खान (Shah Rukh Khan) कोमल नाहटाच्या शोमध्ये बोलत आहे. ‘कधी कधी हे चांगले असते. चित्रपट तेवढा चालला नाही तर निमित्त राहते बॉयकॉट (Boycott) टाकला म्हणून चालला नाही. चित्रपट चांगला होता पण सामाजिक बहिष्कारामुळे चालला नाही’ असे शाहरुख खान म्हणाला होता.

Shah Rukh Khan Latest News
Money Laundering Case : जॅकलिनने केला पक्षपाताचा आरोप; फतेहीचे नाव घेत म्हणाली...

‘तो वारा वाहत होता. त्याची भीती पूर्ण संपली?’ असे कोमल नाहटा म्हणाला. यावर शाहरुख म्हणतो, खरं सांगायचे तर मी मोठे शब्द बोलत नाही आहे. मी वाऱ्याने हलणार नाही. वाऱ्याने झाडं हलतात. भारतात माझ्यावर जेवढे प्रेम केले जाते, तेवढे प्रेम खूप कमी लोकांवर केले जाते. लोकांना योग्य-अयोग्य समजते. मला वाटत नाही की त्याचा माझ्यावर किंवा माझ्या चित्रपटावर कधी परिणाम झाला किंवा होईल.

व्हायरल व्हिडिओवरही (Video Viral) काही लोक शाहरुख खानविरोधात लिहीत आहेत. एका यूजरने लिहिले की, अनेकवेळा याचा घमंड तुटला आहे, तो आणखी तुटणार आहे. हा व्हिडिओ त्यावेळचा आहे जेव्हा शाहरुख खानच्या असहिष्णुतेच्या वक्तव्यामुळे एक वर्ग संतापला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.