Dunki Movie Reality : पंजाबला ड्रग्जनं पोखरलं, हरियणाला अमेरिकेच्या नशेनं पछाडलं! काय आहे 'डंकी' मागील सत्य?

किंग खान शाहरुखचा डंकी चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होतो आहे. त्यामध्ये जो विषय हाताळण्यात आला आहे तो वास्तविक घटनेवर असल्याचे बोलले जात आहे.
Shah Rukh Khan Dunki Movie Hariyana State Reality
Shah Rukh Khan Dunki Movie Hariyana State Reality
Updated on

Shah Rukh Khan Dunki Movie Hariyana State Reality : किंग खान शाहरुखचा डंकी चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होतो आहे. त्यामध्ये जो विषय हाताळण्यात आला आहे तो वास्तविक घटनेवर असल्याचे बोलले जात आहे. परदेशामध्ये अवैध मार्गानं होणारी इंट्री, त्यामुळे निर्माण होणारे प्रश्न, त्यांचा संघर्ष हे सारं चक्रावून टाकणारं आहे. भारतातील एका राज्यातून अशा मार्गानं परदेशी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

डंकी येणार हे कळताच त्याच्या कथेविषयी चर्चा सुरु झाली. त्यातील कथा ही भारतातल्या काही राज्यांतील वास्तविकता आहे. असं बोललं जातं. हरियाणामधील ते वास्तव डंकीच्या निमित्तानं समोर आले आहे. त्या गावातील काही जणांनी हे प्रकरण काय आहे उदाहरण आणि काही प्रसंगाच्या माध्यमातून सांगितले आहे.

Mahua Moitra : महुआ मोइत्रा यांच्यावरील कारवाई आणि वादांची मालिका

हरियाणा राज्यातील त्या जिंद नावाच्या जिल्ह्यामधील गावांतील तरुणांना अमेरिकेत जायचं आहे. तिथं जाऊन पैसे कमवायचे आहेत. अमेरिकेत गेल्यावर त्यांना मिळतो डंकीचा मार्ग. त्यात अवैधरित्या दुसऱ्या देशात जातात. जिंदमधील लोकं हजारो रुपये खर्च करतात. प्रत्येक देशात अवैध मार्गानं जाण्याची वेगळी किंमत आहे. पोर्तुगालमध्ये जायचं असेल तर १५ लाख, जर्मनीमध्ये जायचं तर २५ लाख तर अमेरिकेत जायचं असल्यास ४५ लाख रुपयांचा खर्च आहे.

हरियाणातील त्या गावाता राहून ओळख अमेरिकेपर्यत कशी?

तुम्हाला खोटं वाटेल पण मुलांना छुप्या पद्धतीनं का होईना अमेरिकेत पोहचविणे हा आता मोठा व्यवसाय झाला आहे. मुलांच्या हातांना काम नही अशावेळी त्यांना काही उद्योगाच्या निमित्तानं बाहेर देशात पाठवणे गरज होऊन बसली आहे. तो एक वेगळा एजंटच असतो. पहिली बॉर्डर संपताच दुसरी सुरु होते. शेवटच्या एजंटचे काम असते त्या माणसाला अमेरिकेच्या दरवाजापर्यत नेणे. त्यानंतर मुलांचे काय होते याच्याशी त्याला काही देणेघेणे नसते.

मुलं तिथं गेल्यावर त्यांना त्या देशाच्या करन्सीविषयी सांगितले जाते. खरं तर एजंटलाही त्या मुलांनी बाजारात जाऊन कोणत्याबी वस्तूंची खरेदी करणे नापसंत असते. त्यामुळे त्यांची पोलखोल होण्याचा धोका अधिक असतो. कुणाला औषधं किंवा गरम कपडे हवे असतील त्यांना ते एजंटामार्फतच पोहचवली जातात.

जी मुलं बॉर्डर क्रॉस करुन गेली आहेत त्यांच्यासाठी खास प्रशिक्षण देखील आयोजित करण्यात येते. घाबरुन न जाणे, बोलताना आवश्यक ते शिष्टाचार पाळणे गरजेचे आहे. आम्ही त्यांना सांगतो की, हे हरियाणा नाही तर अमेरिका आहे. शरीरयष्टी सुधारण्यासाठी त्यांना व्यायाम करण्याचा सल्लाही देतो. हरियाणाच्या तरुणांची तब्येत चांगली असते. त्यामुळे त्यांना फार सखोल मार्गदर्शनाची गरज नसते.

दिल्लीमध्ये ते इमीग्रेशनवाले बसलेले असतात. ते पैसे घेऊन कागद बनवून देतात. व्हिसाच्या बाबत बोलायचे झाल्यास तो देशाच्या एका सीमेपर्यतच असतो. तो म्हणजे टुरिस्ट व्हिसा. तिथं पोहचल्यावर डंकीचा मार्ग मोकळा होता. बोट, टॅक्सी, पायी असा शेकडो किलोमीटरचा प्रवास करुन त्या इच्छित स्थळांपर्यत जावे लागते. शेवटी त्या फायनल लक्ष्यापर्यत पोहचणे हा आहे.

काय कामात कुणाला असतो जास्त धोका?

या कामात अनेक धोके आहेत. लोकांना असे वाटते की, ३० ते ४० लाख लोकं ही थेट एजंटच्या खिशात असतात. मात्र परिस्थिती तशी नसते. ते पैसे वाटप करताना मोठी काळजीही घ्यावी लागते. या सगळ्या प्रकरणाविषयी सविस्तर माहिती आज तकनं दिली आहे. त्यात त्यांनी या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे. मुलाला सीमेपलीकडं पोहचण्यात जरासा उशीर झाला की गावातील ज्येष्ठ नागरिक संबंधित एजंटला विचारणा करतात.

Shah Rukh Khan Dunki Movie Hariyana State Reality
Dunki Drop 2 : 'लुट पुट गया' किंग खानच्या गाण्यानं चाहत्यांची जिंकली मनं, 'डंकीचं' नवं गाणं व्हायरल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.