Dunki Review: राजकुमार हिरानी दिग्दर्शित शाहरुख खानचा 'डंकी' पाहायचा प्लॅन करताय? वाचा हा रिव्ह्यू

शाहरुख खानचा डंकी सिनेमा कसा आहे? जाणून घ्या
shah rukh khan dunki movie review directed by rajkumar hirani
shah rukh khan dunki movie review directed by rajkumar hirani SAKAL
Updated on

Dunki Movie Review: शाहरुख खानने २०२३ हे वर्ष गाजवलं. २०२३ ची सुरुवात शाहरुखने 'पठाण'ने केली. पुढे 'जवान'च्या माध्यमातून शाहरुखने आणखी एक ब्लॉकबस्टर दिला. आणि त्यानंतर सर्वांना उत्सुकता होती शाहरुख खानच्या 'डंकी' सिनेमाची.

राजकुमार हिरानी आणि शाहरुख पहिल्यांदाच एकत्र काम करणार होते. त्यामुळे गेले वर्षभर सिनेमाची हवा प्रचंड. तर डंकी कसा आहे याचं एका वाक्यात वर्णन करायचं झालं तर... राजकुमार हिरानींचे सिनेमे पाहिल्यावर आपल्या मनात कुठेतरी रेंगाळतात. डंकी मात्र याला अपवाद आहे. डंकीचा खेळ चांगला मांडला असला तरीही सिनेमा आपल्या हृदयाला भिडत नाही. त्यामुळे एक चुटपूट लागून राहते.

(shah rukh khan dunki movie review)

shah rukh khan dunki movie review directed by rajkumar hirani
शिवानी सुर्वे लग्न कधी करणार? जाणून घ्या

'डंकी'ची लांबी एकूण २ तास ४१ मिनिटांची. डंकीचा फर्स्ट हाफ चांगला झालाय. याचं मुख्य क्रेडीट दिलं पाहिजे ते विकी कौशलला. विकीचा जबरदस्त अभिनयामुळे मध्यंतरापर्यंत सिनेमा चांगला जमून आलाय.

पण सेकंड हाफ मात्र काहीसा गंडल्यासारखा वाटतो. हार्डी आणि त्याच्या मित्रांचा संघर्ष हवा तसा लोकांपर्यंत पोहोचण्यात कमी पडतो.

डंकीची कथा एव्हाना सगळ्यांना समजली असेल. ट्रेलरमधून सर्वांना अंदाज आला असावा. हार्डी (शाहरुख खान) पंजाबला काही कामासाठी येतो. तिथे त्याची भेट तापसी पन्नू आणि तिच्या इतर मित्रांशी येतं. लंडनला जाऊन थोडे पैसे कमावून कुटुंबाला गरिबीतून वर काढण्याचं त्यांचं स्वप्न असतं. यासाठी ते अनेक ठिकाणी दरवाजे ठोठावतात पण अपेक्षाभंगाशिवाय त्यांना काही मिळत नाही. या मित्रांना हार्डी मदत करण्याचं ठरवतो. त्यासाठी एकच पर्याय असतो तो म्हणजे डंकी. आता हे डंकी प्रकरण नेमकं काय? हार्डी सर्वांना लंडनला पोहोचवण्यास यशस्वी होतो का? याची कहाणी म्हणजे डंकी.

झालंय असं की.. राजकुमार हिरानींनी तसा गंभीर विषय डंकीच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलाय. पण या गंभीर विषयाला लव्हस्टोरीची पटकथा जोडल्याने मूळ गोष्ट बाजूला उरते. डंकी संपल्यावर काही रिअल फोटोग्राफमधून त्यांनी डंकीचा खरा अर्थ समोर मांडलाय. तेव्हा या विषयाचं गांभीर्य कळतं. पण सिनेमात लव्हस्टोरीचा तडका दिल्याने डंकी काहीसा बेचव झालाय. जर लव्हस्टोरी थोडी कमी दाखवली असती, तर डंकी आणखी परिणाम साधू शकला असता.

shah rukh khan dunki movie review directed by rajkumar hirani
'पप्पी दे पारू'ला फेम स्मिता गोंदकर 'या' ठिकाणी गेलीय फिरायला

राजकुमार हिरानींचे आजवरचे सिनेमे पाहिले अगदी मुन्नाभाई, 3 इडियट्स, पीके, लगे रहो मुन्नाभाई तर या सिनेमातून त्यांनी विनोदाची यथायोग्य पेरणी करुन गंभीर विषयाला हात घातलाय. डंकीमध्ये त्याचाही अभाव जाणवतो. सिनेमात असलेले विनोदी प्रसंग 'हास्यास्पद' झाले आहेत. त्यामुळे खळखळून हसायला येत नाही. ज्या खास राजकुमार हिरानी मिडास टचची अपेक्षा असते ते अजिबात जाणवत नाही. सगळं वरवरचं वाटतं.

डंकीमध्ये जमेची बाजू काय असेल तर सर्व कलाकारांचा अभिनय. शाहरुख पासून तापसी पन्नूपर्यंत सर्वांनीच त्यांच्या भूमिका चांगल्या साकारल्या आहेत. पण या सर्वांवर कडी केलीय ती म्हणजे विकी कौशलने. विकीची भूमिका अगदी छोटी पण महत्वपूर्ण आहे. आणि विकीने त्याच्या अभिनयाने अशी काय कमाल केलीय की संपूर्ण सिनेमाभर तो लक्षात राहतो. शाहरुख नेहमीप्रमाणेच सहज सुंदर. त्याची एनर्जी कमाल आहे. पण झालंय काय.. की पठाण, जवान बघितल्याने शाहरुखच्या हार्डीच्या भूमिकेत काही नाविन्य दिसत नाही. तापसी पन्नूनेही सुंदर काम केलंय. मित्रांच्या भूमिकेत असलेले अनिल ग्रोव्हर यांनीही त्यांच्या भूमिका सहज साकारल्या आहेत. छोट्याश्या भूमिकेत मराठमोळे कलाकार निखिल रत्नपारखी आणि ज्योती सुभाष लक्षात राहतात.

shah rukh khan dunki movie review directed by rajkumar hirani
Dunki Twitter Review: डंके की चोटपर 'डंकी' चालणार की नाही? नेटकऱ्यांनी काय सांगितलं?

शेवटी सांगायचं झालं तर.. डंकीची सगळी धावपळ अनाठायी वाटते. त्यात लोकांसाठी विशेष काही नवीन नाही. दुर्देवाने राजकुमार हिरानींचा डंकी अपेक्षित परिणाम साधण्यास कमी पडलाय. चांगल्या कथेला कमकुवत पटकथेची जोड दिल्याने प्रेक्षक म्हणून निरस होतो. शाहरुख खानच्या फॅन्सची सुद्धा निराशा होण्याची शक्यता अधिक. आता ख्रिसमस आणि नवीन वर्षाचं औचित्य साधून आलेला डंकी एक हलकाफुलका सिनेमा आहे. पण त्यात मनोरंजनाचा अभाव आहे. डंकीला सकाळकडून अडीच स्टार. २०२३ वर्ष गाजवणाऱ्या शाहरुखच्या डंकीने वर्षाच्या शेवटी मात्र घोर निराशा केलीय हे नक्की. बाकी सिनेमा पाहायचा की नाही हा निर्णय तुमचा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.