Shah Rukh Khan: थरथर कापत होता फॅन, मात्र शाहरुखच्या कृतीने जिंकलं सर्वांचं मन, पाहा व्हिडिओ

शाहरुख खान आणि त्याचा फॅनचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे
Shah Rukh Khan fan was shaking, but Shahrukh's act won everyone's heart, watch the video
Shah Rukh Khan fan was shaking, but Shahrukh's act won everyone's heart, watch the videoSAKAL
Updated on

Shah Rukh Khan Viral Video: बॉलीवूड इंडस्ट्रीचा बादशाह म्हटल्या जाणाऱ्या शाहरुख खानचे असंख्य चाहते आहेत. २०२३ मध्ये तीन सुपरहिट सिनेमांमधून शाहरुखने ४ वर्षांच्या गॅपनंतर इंडस्ट्रीत दमदार कमबॅक केलं

अशातच शाहरुख खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओत एक फॅन शाहरुखला पाहताच थरथर कापत होता. तेव्हा शाहरुखच्या कृतीने सर्वांचं मन जिंकलं.

Shah Rukh Khan fan was shaking, but Shahrukh's act won everyone's heart, watch the video
Megha Ghadge on Pushkar Jog: "जात बघून मैत्री करणारा तू...", मेघा घाडगेंचा पुष्करवर संताप

शाहरुख खानचा व्हिडीओ व्हायरल

'डंकी' सिनेमाच्या निमित्ताने शाहरुखने त्याच्या फॅन्ससाठी खास इव्हेंट आयोजित केला होता. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शाहरुखचा एक चाहता त्याला भेटण्यासाठी स्टेजवर आल्याचे दिसत आहे. तो चाहता थरथर कापत होता.

यानंतर शाहरुख खान त्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि नंतर त्याला खूप प्रेमाने मिठी मारतो. पुढे तो चाहत्यासोबत अनेक फोटो क्लिक करतो. शाहरुख खानच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओचं सगळीकडे खुप कौतुक हौतंय.

२०२३ वर्ष शाहरुखने गाजवलं

२०२३ वर्ष खऱ्या अर्थाने गाजवलं ते शाहरुखने. शाहरुखचे २०२३ मध्ये तीन सिनेमे आले. आणि तिनही सिनेमांनी बॉक्स ऑफीसवर बाजी मारली.

'पठाण', 'जवान', 'डंकी' या तिनही सिनेमांना प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. डंकीने अपेक्षेपेक्षा कमी यश मिळवलं असलं तरीही डंकी अनेकांना आवडल्याचं पाहायला मिळालं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.