आर्यन 'मन्नत'वर आल्यानंतर शाहरुख-गौरीने घेतला एक महत्त्वाचा निर्णय

कॉर्डीलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा खान कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
aryan shah rukh gauri
aryan shah rukh gauri
Updated on

मुंबई: आर्यन खानच्या (Aryan khan) सुटकेमुळे 'मन्नत'वर (Mannat) पुन्हा एकदा आनंदाच वातावरण निर्माण झालं आहे. ड्रग्ज प्रकरणात तब्बल २७ दिवस तुरुंगात (Jail) काढल्यानंतर आर्यनची शनिवारी आर्थररोड कारागृहातून सुटका झाली. आर्यनला गुरुवारीच मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high court) जामीन मंजूर केला होता. पण सर्व कायदेशीर प्रक्रियांच्या पूर्ततेमुळे आर्यनची शनिवारी सुटका झाली.

आर्यन आता घरी परतला असून पुढचे काही दिवस त्याच्या हालचालींवर मीडियाचे बारीक लक्ष असेल. त्यामुळे आर्यन इतक्यात तरी घराबाहेर पडण्याची शक्यता कमी आहे. शाहरुख आणि गौरीने आर्यनच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य देत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बॉलिवूडलाईफ डॉट कॉमने हे वृत्त दिले आहे.

aryan shah rukh gauri
'ये कौन हैं भाई', नवाब मलिकांनी टि्वट केलेला फोटो कोणाचा?

शाहरुख खानच्या कुटुंबात या सर्व घडामोडी घडत असताना आणखी एक चेहऱ्याची चर्चा होती. तो म्हणजे रवी सिंह. शाहरुखने आर्यन तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर त्याला आणण्यासाठी रवी सिंहला पाठवले होते. त्यावरुन शाहरुखचा रवी सिंहवरील विश्वास दिसून येतो. रवी सिंह शाहरुख खानचा अंगरक्षक आहे. रवी सिंह शाहरुख सोबत सतत सावलीसारखा वावरताना दिसतो. शाहरुख प्रमाणेच आता त्याच्या मुलासोबतही एक बॉडीगार्ड असेल.

aryan shah rukh gauri
श्रीमंत लीगमुळे T 20 World cup गेला; चाहत्यांनी काढला IPL वर राग

हा बॉडीगार्ड २४ तास आर्यन सोबत असेल. आर्यन कुठेही गेला? तरी हा बॉडीगार्ड सावलीसारखा त्याच्यासोबत असेल. शाहरुखच्या कुटुंबाच्या जवळ असलेल्या सूत्रांनी ही माहिती दिली. आर्यनची सुरक्षा लक्षात घेऊन गौरी आणि शाहरुखने बॉडीगार्ड ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कारण कॉर्डीलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा खान कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()