Jawan: शाहरुख खानच्या जवानमधील 'ती' गोष्ट गोरखपूरमधील सत्य घटनेवर आधारीत, वाचा सविस्तर

जवानमधली ती गोष्ट गोरखपूर मधल्या एका सत्य घटनेवर आधारीत आहे
shah rukh khan jawan based on true story of gorakhpur sanya malhotra
shah rukh khan jawan based on true story of gorakhpur sanya malhotra SAKAL
Updated on

Jawan: शाहरुख खानचा जवान सिनेमा रिलीज होऊन ४ दिवस झालेत. जवानने प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय. शाहरुख खानने जवानच्या माध्यमातुन पुन्हा एकदा अभिनेता म्हणुन स्वतःला सिद्ध केलं.

शाहरुख खानच्या जवानमध्ये देशाबद्दल महत्वाचा संदेश देण्यात आलाय. अशातच जवानमधला एक प्रसंग खऱ्याखुऱ्या घटनेवर आधारीत असल्याचं बोललं जातंय. काय आहे ती घटना. वाचा सविस्तर.

(shah rukh khan jawan based on true story of gorakhpur sanya malhotra)

shah rukh khan jawan based on true story of gorakhpur sanya malhotra
Genelia Deshmukh: मला दोन - तीन मुलं अजुन चालतील पण... जिनिलीया गरोदर असल्याच्या चर्चांवर रितेशने सोडलं मौन

जवान आणि गोरखपूरची ती खरी घटना

जवान हा बहुप्रतिक्षित चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला असून बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करून प्रेक्षकांची मन जिंकत आहे. जवान मधला सान्या मल्होत्राचा अभिनय देखील प्रेक्षकांना आवडतोय. शाहरुख खान, नयनतारा आणि विजय सेतुपती यांचा समावेश असलेल्या स्टार-स्टड्ड एम्बेबल कास्टमध्ये सान्या मल्होत्राची डॉ. इरामची भूमिका नक्कीच वेगळी ठरते.

दिग्दर्शक अ‍ॅटलीची ही गोष्ट 2017 च्या हृदयद्रावक गोरखपूर रूग्णालयातील दुर्घटनेपासून प्रेरणा घेऊन आली असल्याचं कळतंय. जिथे डॉ. कफील खान यांना अशा दुर्देवी घटनेला सामोरं जावं लागलं. गंभीर आजारी मुलांसाठी बाहेरुन ऑक्सिजन सिलिंडर आणल्याबद्दल डॉ. खान यांच्या प्रयत्नांवर आरोप आणि कायदेशीर लढाईमुळे त्यांना अटक करण्यात आली.

गोरखपूरमधील त्या डॉक्टरांनी मानले शाहरुखचे आभार

डॉ. कफील सोशल मीडियावर म्हणतात “मी जवान पाहिलेला नाही पण लोकं मला मेसेज करत आहेत की त्यांना तुझी आठवण येते. चित्रपट बघताना आणि वास्तविक जीवन यात खूप फरक आहे. लष्करातील गुन्हेगारांना, आरोग्यमंत्री वगैरेंना शिक्षा होते पण इथे मी आणि ती ८१ कुटुंबे न्यायासाठी भटकत आहेत. सामाजिक समस्या मांडल्याबद्दल शाहरुख सर आणि अॅटली सरांचे धन्यवाद."

जवान सिनेमात असलेली ती घटना काय?

सान्या मल्होत्रा सिनेमात ​​एका समर्पित डॉक्टरच्या भूमिकेत आहे जी सरकारी रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठ्याच्या गंभीर समस्येचे निराकरण करण्यासाठी धडपडत आहे. ऑक्सीजन सिलिंडरच्या संकटामुळे 63 निष्पाप लोकांचा मृत्यू होतो. तिच्या पात्राचा प्रवास नाट्यमय वळण घेतो. आणि जेव्हा तिला सरकारकडून अन्यायकारकपणे तुरुंगात टाकले जाते आणि कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप होतो. तिची भूमिका नक्कीच कमाल ठरली आहे. जवानने बॉक्स ऑफीसवर जगभरातुन ५०० कोटींची कमाई केलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.