Shah Rukh Khan Jawan Movie South actor Vijay Sethupathi : बॉलीवूडचा किंग खान म्हणून ज्याची केवळ भारतच नाहीतर जगभरामध्ये ओळख आहे त्या शाहरुखच्या जवानचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. येत्या ७ सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. शाहरुखच्या या चित्रपटाची प्रेक्षकांना गेल्या काही दिवसांपासून कमालीची उत्सुकता आहे.
याच वर्षी जानेवारीच्या २५ तारखेला शाहरुखचा पठाण नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यालाही शाहरुखच्या चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले होते. तब्बल एक हजार कोटींची कमाई करुन या चित्रपटानं वेगळा विक्रम आपल्या नावावर केला होता. चित्रपटावर टीका करणाऱ्यांना शाहरुखनं जशास तसे उत्तरही दिले होते.
Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ
आता एसआरकेच्या जवानची मोठी क्रेझ आहे. यापूर्वी त्याच्या व्हायरल झालेल्या गाण्याला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली होती. भलेही शाहरुखनं वयाची साठी पार केली असेल पण त्याचा लूक, एनर्जी आणि स्टाईलचे चाहते जगभर पसरले आहेत. त्यामुळे शाहरुखचा चित्रपट म्हटल्यावर प्रेक्षकांच्या उत्साहाला उधाण आल्याचे दिसून येत आहे. शाहरुखच्या जवानमध्ये वेगवेगळया कलाकारांची फौज आहे.
शाहरुखनं जवानमध्ये व्हिलनच्या भूमिकेत साऊथचा प्रसिद्ध अभिनेता विजय सेतुपति, प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा, द फॅमिली मॅन वेबसीरिजमधील अभिनेत्री प्रियामणि यांच्या भूमिका आहेत. गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडनं त्यांचे चित्रपट यशस्वी होण्यासाठी वेगळा पॅटर्न निवडल्याचे पाहायला मिळते. त्यात साऊथचे कलाकार घेऊन तो चित्रपट पॅन प्रोजेक्ट अंतर्गत प्रदर्शित करण्यास प्राधान्य दिले आहे.
ज्यावेळी एस एस राजामौली यांचा आरआऱआऱ नावाच्या चित्रपटाचे प्रमोशन सुरु केले होते त्यात सलमान, आमिर खान सहभागी झाले होते. तेव्हापासून साऊथमधील काही दिग्दर्शकांनी बॉलीवूडच्या कलाकारांना आपल्या चित्रपटात भूमिका देत वेगळी स्टॅटर्जी फॉर्म केल्याचे दिसून आले. राजामौली यांनी त्यांच्या आऱआऱआर चित्रपटामध्ये आलिया भट्ट आणि अजय देवगण यांना कास्ट केले होते.
चिरंजीवी यांनी देखील त्यांच्या गॉडफादर चित्रपटामध्ये बॉलीवूडचा भाईजान सलमान खानला घेतले होते. दुसरीकडे सलमाननं देखील त्याच्या किसी का भाई किसी की जानमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री पूजा हेगडे, रामचरण यांना कास्ट केले होते. त्यानंतर आता शाहरुखच्या चित्रपटातील साऊथच्या कलाकारांविषयी सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहे.
शाहरुखनं आता साऊथच्या कलाकारांना आपल्या चित्रपटात सहभागी करुन घेणे याचा अर्थ काय, ही वेगळी स्टॅटर्जी तर नाही ना, हल्ली बॉलीवूड साऊथच्या कलाकारांना सहभागी करुन घेण्यास प्राधान्य दाखवत आहे. हा ट्रेंड आता एक दोन वर्षांत वाढलेला दिसतो यात बिझनेस स्टॅटर्जीचा विषय आहे की काय, असे प्रश्न सोशल मीडियावर नेटकरी उपस्थित करताना दिसत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.