Shah Rukh Khan: 'किंग ऑफ हार्ट', कोलकातामध्ये अ‍ॅसिड हल्ल्याचा शिकार झालेल्यांची शाहरुखने घेतली भेट

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने नुकतीच कोलकातील अॅसिड हल्ल्याचा शिकार झालेल्या लोकांची भेट घेतली आहे.
shah rukh khan
shah rukh khanSakal
Updated on

सुपरस्टार शाहरुख खान सध्या 'पठाण'च्या यशाचा आनंद घेत आहे. अलीकडेच किंग खान देखील त्याचा क्रिकेट संघ विराट कोहलीच्या संघाविरुद्ध खेळताना पाहण्यासाठी तो कोलकात्यातही गेला होता. यादरम्यान शाहरुख त्याची मुलगी सुहाना खान आणि शनाया कपूरसोबत स्पॉट झाला होता.

स्टेडियमचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. त्याच वेळी, सामना संपल्यानंतर, बॉलीवूडच्या बादशाहने कोलकाता येथे अॅसिड हल्ल्याचा शिकार झालेल्या लोकांचीदेखील भेट घेतली आहे. ज्यांचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत आणि चाहते किंग खानचे खूप कौतुक करत आहेत.

शाहरुखच्या फॅन क्लबने कोलकाता येथील अॅसिड हल्ल्याचा शिकार झालेल्या लोकांसोबत अभिनेत्याचे फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये, अभिनेता काळ्या शर्टमध्ये आणि रिप्ड जीन्समध्ये डॅपर वाइब्स देताना दिसत आहे.

यादरम्यान सुपरस्टार सर्वांसोबत आनंदी पोज देताना दिसत आहे. त्याचबरोबर शाहरुख खानची ही स्टाईल चाहत्यांना खूप आवडली आहे. शाहरुखने त्याच्या व्यस्त वेळापत्रकात अॅसिड हल्ल्याचा शिकार झालेल्या मंडळींची भेट घेतल्याने चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचं कौतुक करत आहेत.

shah rukh khan
Shah Rukh Khan: ‘झुमे जो रिंकू', शाहरुखनं कौतुक करताच क्रिकेटर झाला क्लिन बोल्ड

दुसरीकडे, सोशल मीडियावर शाहरुख खानच्या अॅसिड हल्ल्याचा शिकार झालेल्या लोकांसोबतच्या भेटीचे फोटो व्हायरल होताच चाहतेही अभिनेत्याचे जोरदार कौतुक करत आहेत. शाहरुख खान खरचं माणूस म्हणून खूप चांगला आहे. किंग ऑफ हार्ट्स, शाहरुख सुपरस्टार असला तरी आजही त्याचे पाय जमिनीवरच आहेत, अशा कमेंट्स चाहते करत आहेत.

'पठाण'नंतर शाहरुख खान आता अॅटलीच्या 'जवान' चित्रपटात दिसणार आहे. सध्या तो या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात नयनतारा, सुनील ग्रोव्हर आणि सान्या मल्होत्रा ​​यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

याशिवाय त्याच्याकडे राजकुमार हिरानीचा 'डंकी' आहे ज्यामध्ये तो तापसी पन्नूसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. हा चित्रपट 2023 च्या ख्रिसमस दरम्यान प्रदर्शित होणार आहे. या दोन्ही चित्रपटांमध्ये शाहरुख खानला पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.