Shah Rukh Khan Not Great Actor Pakistani Actress Mahnoor : बॉलीवूडचा किंग शाहरुख खान हा काही फक्त भारतातच लोकप्रिय आहे असे नाही. जगभरामध्ये तिचा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावर शाहरुखचा चाहतावर्ग मोठा आहे. आपला शेजारील देश पाकिस्तानात देखील शाहरुखचे चाहते मोठे आहेत. किंग खानचा पठाण जेव्हा भारतात प्रदर्शित झाला तेव्हा तो पाकिस्तानमध्ये देखील चोरुन दाखवण्यात आल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या.
आता एका पाकिस्तानी अभिनेत्रीनं थेट किंग खानवर टोकाची टीका केली आहे. त्या अभिनेत्रीचे नाव महनूर बलोच असे आहे. ही अभिनेत्री नेहमीच तिच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे चर्चेत येत असते. आताही तिनं थेट शाहरुखवर टीका करुन शाहरुखच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. काही नेटकऱ्यांनी तिच्यावर सडकून टीकाही केली आहे. शाहरुखचा चाहता हा भारताच्या कानाकोपऱ्यात विखूरलेला आहे. त्याचा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे कळताच चाहत्यांच्या आनंदाला उधाण येतो.
Also Read - manipur violence : दोन महिन्यांपासून अशांत असलेलं मणिपूर हे नवं काश्मीर बनतंय का? या
महनूरनं आता तिच्या एका मुलाखतीतून केलेलं भाष्य अनेकांसाठी प्रतिक्रियेचा विषय आहे. तिनं त्यात म्हटले आहे की, तुम्ही शाहरुखला एवढा डिमांड का देता त्याला अॅक्टिंग काही येत नाही. तो तुम्ही समजता तेवढा हँडसम देखील नाही. त्यामुळे मला त्याच्यावरुन जे कुणी कौतूकाचा वर्षाव करता तो करायला हवा असे वाटत नाही. असेही महनूरनं म्हटले आहे. तिच्या त्या वक्तव्यामुळे मात्र अनेकांचा संताप झाला आहे. नेटकऱ्यांनी तिच्यावर आगपाखड केली आहे.
महनूरनं शाहरुखचा अभिनयच नव्हे तर त्याच्या लूक्सवर देखील भाष्य केले आहे. ती म्हणते तुम्हाला तो हँडसम वाटतो हेच विशेष आहे. त्याचे व्यक्तिमत्व आकर्षक आहे. मात्र तुम्ही त्याला ब्युटीचे काही पॅरामीटर लावता तेव्हा मात्र आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. त्याच्याजवळ वेगळा ओरा नाही. त्यामुळे त्याला कुणी फारसं नोटीस करत नाही. हेही महनूरनं यावेळी सांगितलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.