शाहरुख खानचा ‘पठाण’ येत्या बुधवारी २५ तारखेला प्रदर्शित होणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच धूमाकूळ घालत आहे. चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग तुफान वेगाने सुरू आहे. पठाण चित्रपटातून 4 वर्षांनंतरशाहरुख रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे. शाहरूखच्या चाहत्यांना त्याला पडद्यावर पाहण्याची इच्छा आहे.
किंग खानचे चाहते त्याला पाहण्यासाठी हजारो रुपयांची तिकीटं खरेदी करत आहेत. यावरून शाहरुख खानची किती क्रेझ आहे. याचा अंदाज येऊ शकतो. 20 जानेवारीपासून पठाणचे अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाल्यापासून चित्रपटाच्या तिकिटांचे दर गगनाला भिडले आहेत.
राजधानी दिल्लीतील काही मल्टिप्लेक्समध्ये तर चक्क पठाणचे तिकीट 2100 रुपयांपर्यंत विकले जात आहे. याशिवाय काही चित्रपटगृहांमध्ये मॉर्निंग शोची तिकिटेही 1000 रुपयांपर्यंत विकली जात आहेत. इतकी महाग तिकिटे असूनहीशाहरुखच्या 'पठाण'नं आगाऊ बुकिंगंचे सर्व रेकॉर्ड मोडले आहे. 'पठाण'च्या हिंदी आणि तेलुगू व्हर्जनच्या तिकीटांची सर्वाधिक विक्री होत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 14.66 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
इतकेच नव्हेतर गुरुग्राममधील अॅम्बियन्स मॉलमध्ये पठाणचे तिकीट 2400, 2200 आणि 2000 रुपयांना विकले जात आहे. इतके महागडे तिकीट असूनही सर्व शो फुल झाले आहेत. त्यामुळं चाहत्यांचं शाहरुखवर खूप प्रेम आहे हे मान्य करावे लागेल. पठाणबाबत सुरू असलेल्या वादाचाही चाहत्यांवर काहीही परिणाम झाला नसल्याचं दिसत आहे.
पठाण २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. शाहरुख पठाणमध्ये दीपिका पदुकोणवर रोमान्स करताना दिसणार आहे. यात जॉन अब्राहमही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आता रिलीजनंतर पठाण किती रेकॉर्ड करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.