शाहरुख खान 4 वर्षांनंतर पुनरागमन करत आहे, अॅक्शन-थ्रिलर 'पठाण' अखेर मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे आणि बॉलिवूडच्या बादशहाला पाठिंबा देण्यासाठी चाहते मोठ्या संख्येने थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. 'पठाण'ने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये ज्याप्रकारे रेकॉर्ड केले आहेत, त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ओपनिंग देण्यासाठी सज्ज झाला आहे.
बॉलीवूड इंडस्ट्री ट्रॅकिंग वेबसाइटच्या मते, चित्रपट पहिल्याच दिवशी 50 कोटींचा टप्पा पार करू शकतो. हा चित्रपट कन्नड चित्रपट KGF 2 (53.9 कोटी), हृतिक रोशन-स्टार वॉर (53.3 कोटी) आणि आमिर खानच्या ठग्स ऑफ हिंदुस्तान (52 कोटी रुपये) च्या हिंदी डब केलेल्या आवृत्तीला टक्कर देईल.
पठाण हा शाहरुख खानचा सर्वात मोठा ओपनिंग करणारा चित्रपट बनेल. हृतिक रोशनचे वॉर आणि शाहरुख खानचे पठाण हे एकाच स्पाय युनिव्हर्सचे भाग आहेत. या चित्रपटात वॉर मधील कर्नल लुथरा (आशुतोष राणा) चे पात्र दाखवले जात आहे.
पठाणने पहिल्या दिवशी दुपारी 3 वाजेपर्यंत 19.67 कोटी रुपये जमा केले आहेत. चित्रपटाने पीव्हीआरमध्ये 9.40 कोटी, आयनॉक्समध्ये 7.05 कोटी, सिनेपोलिसमध्ये 3.90 कोटींची कमाई केली आहे.
पठाणने रिलीज होण्यापूर्वी 32 कोटी रुपयांची तिकिटे विकली होती आणि सकाळपासूनच चित्रपटगृहांबाहेर प्रचंड गर्दी दिसल्याने, चित्रपटाला चांगले रिव्ह्यू मिळत आहेत. तरण आदर्शसह अनेक चित्रपट समीक्षकांनी पठाणला 4.5 स्टार रेटिंग दिले आहे. उद्या 26 जानेवारीची सुट्टी आणि त्यानंतर येत्या वीकेंडमध्ये चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये मोठी झेप घेता येईल.
वीकेंडपर्यंत हा चित्रपट 200 कोटींचा गल्ला जमवेल अशी अपेक्षा आहे. अॅडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत, पठाणने बुधवारी सकाळी रिलीज होण्याच्या दोन तास आधी एसएस राजामौलीच्या बाहुबली 2 ला पराभूत केले. 2023 हे शाहरुखसाठी मोठे वर्ष असण्याची अपेक्षा आहे. पठाणनंतर तो एटलीचा जवान आणि राजकुमार हिरानीच्या डंकी या चित्रपटात दिसणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.