Shahrukh Khan च्या ट्वीटमुळे सोशल मीडियावर खळबळ..लोक सर्च करू लागले ''गैटेका' नावाचा सिनेमा..काय आहे प्रकरण?

शाहरुख खाननं 'पठाण'ला मिळालेल्या जबरदस्त ओपनिंग नंतर पहिलं ट्वीट केलं होतं ज्यामुळे २६ वर्षापूर्वी रिलीज झालेल्या एका सिनेमाची चर्चा सुरू झाली आहे.
Shah Rukh Khan
Shah Rukh KhanGoogle
Updated on

Shahrukh Khan Tweet: शाहरुख खानच्या एका ट्वीटनं सोशल मीडियावर एक जोरदार चर्चा सुरु झाली आहे. किंग खाननं या ट्वीटमध्ये १९९७ साली आलेल्या 'गैटेका' या हॉलीवूड सिनेमाचा डायलॉग लिहिला आहे. ज्यानंतर या सिनेमाला घेऊन नेटकऱ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता वाढली आहे.

चला जाणून घेऊय़ा,नेमका हा सिनेमा कोणता आहे आणि याला आपण कुठे पाहू शकतो. शाहरुखच्या त्या ट्वीटनं 'गैटेका' सिनेमाला लोक इंटरनेटवर सर्च करताना दिसत आहेत.

आता प्रत्येकाला जाणून घ्यायचं आहे ते हा सिनेमा नेमका कोणता आहे आणि याला कुठे पाहू शकतो? चला जाणून घेऊया याविषयी सविस्तर.(Shah rukh Khan tweet gattaca movi dialogue know about hollywood movie)

Shah Rukh Khan
Pathaan 2: शाहरुखचा 'पठाण' पाहिलात का?, सिनेमातील 'या' सीन मध्ये दडलीय 'पठाण'च्या सीक्वेलची घोषणा...

सुरुवातील थोडं किंग खानच्या ट्वीटविषयी जाणून घेऊया. शाहरुखने एक खास ट्वीट करत चाहत्यांना एक मोलाचा सल्ला दिला आहे. त्यानं लिहिलं आहे,''गैटेका ..मी परत येण्यासाठी हातात काहीच शिल्लक नाही ठेवलं आहे''.

''मला वाटतं आयुष्य काहीसं असंच असतं. तुम्हाला तुमचं परतणं कधी प्लॅन करावं लागत नाही. तुम्हाला फक्त पुढे जायचं असतं. कधी मागे परतू नका..किंबहुना त्या गोष्टीला पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जे तुम्ही सुरू केलेलं असतं. हा एका ५७ वर्षाच्या माणसाचा सल्ला आहे''.

या ट्वीटनंतर चाहते आता इच्छुक आहेत,ते 'गैटेका सिनेमा नेमका कोणता आहे हे जाणून घेण्यासाठी. तर थोडक्यात इथं सांगतो की,'गैटेका हा हॉलीवूडचा एक डिस्टोपियन सायन्स फिक्शन सिनेमा आहे,जो १९९७ साली रिलीज झाला होता.

सिनेमाची कहाणी एका भविष्यावर आधारित होता,ज्यामध्ये माणूस जेनेटिक्सच्या सहाय्यानं आपल्या क्षमतेला ओळखू शकतो. यामुळे अनेक लोकांना जेनेटिक भेदभावाचा सामना करावा लागतो. यादरम्यान एक मुलगा आपलं नशीब बदलवण्यासाठी सिस्टशी खोटं बोलतो आणि आपल्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो. अर्थात तो रस्ता सोपा नक्कीच नसतो.

Shah Rukh Khan
Abhijit Panse यांना शिंदे गटाकडून ऑफर? फिरणार का ठाण्यातील राजकारणाची सूत्र?...

या सिनेमाला पीजी १३ रेटिंग मिळालं होतं. याचं कारण म्हणजे सिनेमात दाखवली गेलेली हिंसा, त्याची भाषा आणि सेक्शुअलिटी हे होतं. ३६ मिलियन डॉलर म्हणजे जवळपास २९४ करोड बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमानं बॉक्सऑफिसवर १२.५ मिलियन डॉलर म्हणजे १०१ करोड रुपये कमाई केली होती.

जर तुम्हला हा सिनेमा ओटीटीवर पहायचा असेल तर थोडं कठीण आहे. कारण भारतात हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.