Dunki: पठाण अन् जवाननंतर शाहरुख 'डंकी'मुळेही झाला मालामाल! रिलीजपुर्वीच कमावले इतके कोटी!

Dunki Rights Sold Out on OTT: शाहरुख खानचा डंकी हा चित्रपट यावर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
Dunki Rights Sold Out on OTT:
Dunki Rights Sold Out on OTT:SAKAL
Updated on

Dunki Rights Sold Out on OTT: बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान सध्या त्याच्या सुपरहिट सिनेमांमुळे चर्चेत आहे. 2023 हे वर्षच शाहरुख खानसाठी खुप खास ठरलं. कारण या वर्षात शाहरुखचे दोन हिट सिनेमे रिलिज झाले आणि आता एक हिट सिनेमा रिलिजसाठी सज्ज आहे. या वर्षी शाहरुखचा पठाण हा सिनेमा रिलिज झाला ज्याने बॉक्स ऑफिस धुराळा उडवला.

Dunki Rights Sold Out on OTT:
Bigg Boss 17: 'मी त्याच्या अंत्यसंस्काराला नाही गेले कारण..', सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबद्दल अंकिताचा पुन्हा नवीन खुलासा

त्यानंतर आला तो 'जवान'. या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड मोडले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर हजार कोटींच्यावर गल्ला जमवला. आता या वर्षाच्या शेवटी शाहरुखचा तिसरा चित्रपट 'डंकी' रिलीज होणार आहे.

शाहरुख खानसोबतच त्याच्या चाहत्यांनादेखील या चित्रपटाकडून खुप अपेक्षा आहेत. त्यातच आता या चित्रपटाने रिलिजच्या आधीच करोडोंची कमाई केली असल्याच्या चर्चा सुरु आहे.

Dunki Rights Sold Out on OTT:
Emmy Awards 2023: आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार सोहळ्यात भारताचा डंका, वीर दास, एकता कपूरने पटकावला पुरस्कार

शाहरुखचा डंकी हा चित्रपट 22 डिसेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यातच आता या चित्रपटाची एका OTT प्लॅटफॉर्मसोबत करोडोंची डिल झाल्याचं बोललं जात आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुखच्या 'डंकी चित्रपटाचे ओटीटी हक्क Jio सिनेमाने 230 कोटी रुपयांना विकले आहेत. मात्र, या वृत्ताला अद्याप निर्मात्यांनी अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

Dunki Rights Sold Out on OTT:
Karanvir Bohra: सौभाग्यवती भव: 2 च्या सेटवर अभिनेत्याचा अपघात! मालिकेचे शुटिंग थांबवले

'3 इडियट्स', 'पीके', 'संजू' सारखे अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या राजकुमार हिरानी यांनी शाहरुख खानच्या डंकी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाची कथा 'हार्डी' म्हणजेच शाहरुखच्या आयुष्याभोवती फिरते.

तापसी पन्नू, विकी कौशल, विक्रम कोचर आणि अनिल ग्रोव्हर हे त्याचे जीवलग मित्र आहेत ज्यांना लंडनला जाण्यासाठी हार्डी मदत करणार असतो. विशेष म्हणजे या चित्रपटात शाहरुख खान आणि तापसी पन्नू यांची जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे.

या चित्रपटाचा पहिला ड्रॉप रिलिज करण्यात आला आहे तर दुसरा ड्रॉप हा लवकरच रिलिज करण्यात येणार आहे.याशिवाय बोमन इराणी, सतीश शाह, दिया मिर्झा हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.