Shahid Kapoor: बॅकग्राउंड डान्सर ते सुपरहिरो... स्टारकिड असूनही शाहिदचं जीवन सोप नव्हतं....

shahid kapoor
shahid kapoor Esakal
Updated on

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहिद कपूरचं नावं घेतलं तर डोळ्यासमोर येतात ती त्याची दोन रुप.. एक तर विवाह आणि जब वी मेट मधला कुल आणि चॉकलेट बॉय तर दुसरीकडे आर राजकुमार आणि कबीर सिंगमधला रावडी लुकमधली शाहिद. त्याची क्रेझ ही त्यावेळीही होती आणि आजही तितकीच आहे. आज शाहिदचा वाढदिवस या निमित्त त्याच्याबद्दलच्या काही खास बाबी ज्या तुम्हाला माहित असाव्यात त्याच आज आपण जाणुन घेवुया.

shahid kapoor
Urfi Javed New Look: 'तुला पाहून चेटकिणीलाही अटॅक यायचा',उर्फीचा नवा लुक व्हायरल..नेटकरीही घाबरले

शाहिद त्या स्टार किड्सपैकी एक आहे ज्यांना फिल्म इंडस्ट्रीत येण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. त्याच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक चढउतारांचा सामना केला. त्याचे वडील अभिनेते पंकज कपूर आणि आई अभिनेत्री नीलम आझमी हे इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते आहेत. तो चार वर्षांचा असताना त्याच्या पालकांचा घटस्फोट झाला होता.

आज शाहिद बॉलिवूडमधील लोकप्रिय आणि मोठ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे, परंतु एकवेळी त्याच्या करिअरमध्ये एक असा टप्पा होता जेव्हा तिने बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम केले.

shahid kapoor
Javed Akhtar: 'जणू मी तिसरं महायूद्धचं जिंकलं..', पाकिस्तानबद्दलच्या त्या वक्तव्यावर जावेद अख्तर यांची प्रतिक्रिया

'दिल तो पागल है' आणि 'ताल' सारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये शाहिद बॅकग्राउंड डान्सर म्हणून दिसला. यानंतर अभिनेता अनेक जाहिरातींमध्येही दिसला. बऱ्याच संघर्षानंतर शाहिदने 2003 मध्ये 'इश्क विश्क' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

त्याला या चित्रपटात चांगलीच पसंती मिळाली होती. यानंतर शाहिद अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत दिसला. 'फिदा', 'दिल मांगे मोर', 'दिवाने हुए पागल', 'वाह!' असे चित्रपट केले. 'लाइफ हो तो ऐसी' सारख्या चित्रपटात काम केले.

shahid kapoor
Kashmera Shah: 'इतकी कशाला घ्यायची', कश्मीराचं आधी नवऱ्याला किस अन् नंतर...नेटकऱ्यांनी सगळी नशाच उतरवली

२००६ साली आलेला सूरज बडजात्याचा 'विवाह' हा चित्रपट आणि 2007 मध्ये इम्तियाज अलीच्या 'जब वी मेट' हे चित्रपट त्याच्यासाठी हिट सिनेमे ठरले. शाहिदचे हे चित्रपट त्याच्या कारकिर्दीतील हिट चित्रपटांपैकी एक आहे. त्यानंतर त्याच्या हिट सिनेमांना कुठं ब्रेक लागल्याचं दिसलं मात्रल त्यानंतर कबिर सिंगमधुन शाहिदनं जबरदस्त कमबॅक केलं.

2016 मध्ये शाहिदने एका मुलाखतीत त्याने संघर्षाबद्दल सांगितले की, सुरुवातीच्या दिवसांमध्ये असे बरेचदा व्हायचे की त्याच्याकडे ऑडिशनला जाण्यासाठी भाड्यासाठी पैसे नव्हते. बॉलिवूडमध्ये एंट्री घेण्यापूर्वी जवळपास 100 चित्रपट नाकार मिळाला होता. आज शाहिद कपूरची गणना इंडस्ट्रीतील टॉप कलाकारांमध्ये केली जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()