Taarak Mehta Ka ooltah Chashmah: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेमुळे घराघरात प्रसिद्ध झालेले शैलेश लोढा यांनी लखनौमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात सहभाग घेतला होता. या साहित्य संमेलनात शैलेश लोढा यांनी खूप सुंदर कवितांच्या रचना ऐकवल्या. त्यांनी आपले वडील श्याम सिंग लोढा यांच्याविषयी देखील बातचीत केली. आणि एका मह्त्वाच्या प्रश्नाचे देखील उत्तर दिले.
शैलेश लोढा यांनी आपल्या वडीलांप्रती बोलताना मजेशीर अंदाजात ते म्हणाले की,'' माझ्या वडीलांवरती काही खास लिहिलं आहे...जे मी तुम्हाला ऐकवीन पण मग हा शो माझ्या वडीलांना दाखवू नका..कारण घराचे पेपर्स आजही त्यांच्याच नावावर आहेत''.
शैलेश लोढा म्हणाले-''माझ्या वडीलांच्या दोन्ही किडनी खराब झाल्या आहेत. ते डायलिसिसवर आहेत. पण तरीही देखील ते खूप फनी आहेत. मी त्यांच्याकडे एकदा किडनी ट्रान्सप्लान्ट विषयी बोललो होतो''.
'' म्हटलं एवढे पैसे दिले तर नवीन किडनी लावता येईल. तर ते मला म्हणाले,मग डॉक्टरला विचार जुन्या किडनीचे किती देणार?''(Shailesh Lodha indirectly target asit modi talks about leaving taarak mehta show)
मग शैलेश लोढा यांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारला गेला. जो गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका त्यांनी का सोडली असं शैलेश लोढा यांना विचारला गेला.
तेव्हा शैलेश लोढा म्हणाले-''जे सोडलं त्याविषयी काय बोलायचं? तसा हा राष्ट्रीय प्रश्न आहे. तुम्ही मी जे बोलतो त्याचा इशाऱ्यांमध्ये समजलं तर बरं होईल. ज्या देशात पब्लिशर जे दुसऱ्याचं पुस्तक छापतात ते हिऱ्याची अंगठी घालून फिरतात आणि लेखकाला स्वतःला आपलं पुस्तक छापण्यासाठी पैसे द्यावे लागतात''.
'' दुसऱ्यांच्या प्रतिभाशक्तीवर कमावणारे बिझनेसमन लोक जर का स्वतःला प्रतिभावान आणि मोठा समजू लागले तर मग त्या खऱ्या प्रतिभावान व्यक्तीला आवाज उठवावा लागतोच..त्याला समोरच्याला सांगावं लागतंच की तू माझ्या प्रतिभाशक्तीचा फायदा घेत स्वतःचे खिसे भरतोयस''.
शैलेश लोढा पुढे म्हणाले,''आणि मी तोच आहे ज्यानं आवाज उठवला. दुसऱ्यांच्या प्रतिभेवर पैसे कमावणारे लोक कोणत्याही प्रतिभाशाली व्यक्तीपेक्षा मोठे नसतात. जगातला कोणताही पब्लिशर कोणत्याही लेखकापेक्षा मोठा नसतो. जगातला कोणता निर्माता एखाद्या अभिनेत्यापेक्षा मोठा नसतो. जगातला कोणता दिग्दर्शक एखाद्या अभिनेता-अभिनेत्रीपेक्षा मोठा नसतो''.
''ते बिझनेसमन आहेत हे आम्हाला वेळीच समजायला हवं. मी कवी आहे, मी अभिनेताही आहे. जेव्हा जेव्हा कुणी माझ्या कवी होण्यावर..अभिनेता होण्यावर..माझ्या विचारांवर...त्याच्या व्यवहारानं प्रहार करेल तर ज्वालामुखी फूटणारच ना''.
लखनऊमध्ये झालेल्या साहित्य संमेलनात शैलेश लोढानं मुलगी, आई आणि अश्रूंवर कविता ऐकवल्या. ते म्हणाले,'आईवर कोणी कवीता नाही लिहू शकत. जिनं तुम्हाला लिहिलंय तिच्यावर कोणी कविता कसं लिहू शकले. माणसानं आपलं मूळ कधी विसरलं नाही पाहिजे हा चांगला विचारही त्यांनी या संमेलनात उपस्थितांसोबत शेअर केला''.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.