Shaitaan: 'शैतान'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; दुसऱ्या दिवशी केली कोट्यवधींची कमाई, जाणून घ्या कलेक्शन

Shaitaan: दोन दिवसातच 'शैतान' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत...
Shaitaan
Shaitaanesakal
Updated on

Shaitaan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आणि अभिनेता आर.माधवन (R. Madhavan) यांचा 'शैतान' (Shaitaan) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाचं अनेकजण कौतुक करत आहेत. हा चित्रपट शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता दोन दिवसातच या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत...

sacnilk या वेबसाइटच्या सध्याच्या रिपोर्टनुसार, शैतान या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी 14.75 कोटींची कमाई केली आहे. तर या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी 18.75 कोटींची कमाई केली आहे. आता या सिनेमाचं आतापर्यंतचं एकूण कलेक्शन 33.5 कोटी इतके झाले आहे.

तसेच जगभरातील बॉक्स ऑफिसवर देखील शैतान चित्रपट धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटानं जगभरातील बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं जगभरातील बॉक्स ऑफिसवर दोन दिवसात जवळपास 47.9 कोटींची कमाई केली आहे. आता लवकरच हा सिनेमा जगभरातील बॉक्स ऑफिसवर हाल्फ सेंच्युरी करेल, असा अंदाज लावला जात आहे.

Shaitaan
Shaitan Review: आर.माधवन भाव खाऊन गेला, हिरोपेक्षा व्हिलन वरचढ ठरला, पण काही गोष्टी मात्र खटकल्या, कसा आहे शैतान? वाचा रिव्ह्यू

'शैतान' हा चित्रपट 'वश' या गुजराती चित्रपटाचा रिमेक आहे. वाश हा कृष्णदेव याज्ञिक दिग्दर्शित चित्रपट गेल्या वर्षी रिलीज झाला होता. शैतान या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहलनं केलं आहे. या चित्रपटात आर. माधवनसोबतच ज्योतिका, अंगद राज, जानकी बोदीवाला यांनी देखील भूमिका साकारल्या आहेत.

'शैतान' या चित्रपटाचे कथानक हे काळी जादू, वशीकरण यावर आधारित आहे. सिनेमाचे कथानक एका कुटुंबावर आधारित आहे ज्यामधील मुलीला वनराज नावाचा व्यक्ती वशमध्ये करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.