Shaitan Review: आर.माधवन भाव खाऊन गेला, हिरोपेक्षा व्हिलन वरचढ ठरला, पण काही गोष्टी मात्र खटकल्या, कसा आहे शैतान? वाचा रिव्ह्यू

Shaitan Review:एका हसत्या-खेळत्या कुटुंबाचं आयुष्य केवळ काळ्या जादूमुळे उद्धवस्त होतं. खरंतर अशा गोष्टींवर विश्वास नसणाऱ्यांना हा चित्रपट थ्रिलरपेक्षा कॉमेडी जास्त वाटेल पण सिनेमा म्हणून जरी याकडे पाहिलं तरी देखील यात अनेक गोष्टी खटकतात.
Shaitan Review
Shaitan Reviewesakal
Updated on

Shaitan Review: काळी जादू, वशीकरण... ही नावं ऐकली जरी तरी मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. सध्याच्या आधुनिक जगात या गोष्टींवर खरंच विश्वास ठेवावा की नाही? हा प्रश्न देखील अनेकांना पडत असेल. अशताच आता काळ्या जादूवर आधारित असणारा शैतान (Shaitan) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. एका हसत्या-खेळत्या कुटुंबाचं आयुष्य केवळ काळ्या जादूमुळे उद्धवस्त होतं. खरंतर अशा गोष्टींवर विश्वास नसणाऱ्यांना हा चित्रपट थ्रिलरपेक्षा कॉमेडी जास्त वाटेल पण सिनेमा म्हणून जरी याकडे पाहिलं तरी देखील यात अनेक गोष्टी खटकतात.

कथानक

सिनेमाचे कथानक कबीरच्या कुटुंबावर आधारित आहे. कबीर, ज्योती आणि त्यांची दोन मुलं हे कुटुंब त्यांच्या फार्म हाऊसमध्ये हॉलिडेसाठी जातं. फार्म हाऊसमध्ये जात असतानाच वाटेत त्यांना वनराज नावाचा एक व्यक्ती भेटतो. हा व्यक्ती कबीर आणि त्याच्या कुटुंबासोबत गप्पा मारतो, गप्पा मारताना तो कबीरची मुलगी जान्हवीला वशमध्ये करतो. त्यानंतर पुढे कबीरची मुलगी जान्हवी ही वनराज जसं सांगेल अगदी तसंच वागायला सुरुवात करते.

अभिनय

सिनेमात आर.माधवन भाव खाऊन गेलाय. यावेळी हिरोपेक्षा व्हिलन वरचढ ठरलाय. अजय देवगण जरी या चित्रपटाचा हिरो असला तरी चित्रपट पाहून झाल्यानंतर लक्षात फक्त आर.माधवनचा परफॉर्मन्स राहतो. सिनेमातील आर. माधवनचा "अहं ब्रह्मास्मि" डायलॉग तर प्रेक्षकांच्या टाळ्या-शिट्या घेतो. 'रहना है तेरे दिल में' मधील चॉकलेट बॉयची इमेज आर. माधवननं या चित्रपटातून खोडून काढली आहे. अजय, ज्योतिका, जानकी बोदीवाला (जाह्नवी) आणि अंगद राजनं (ध्रुव) त्यांच्या भूमिका चांगल्या साकारल्या आहे. पण लक्षात फक्त आर.माधवनच राहतो.

जबरदस्त क्लायमॅक्स

सिनेमाचा क्लायमॅक्स खूप चांगल्या पद्धतीनं मांडण्यात आला आहे. क्लायमॅक्स सीनचा सेट, त्या सीनमधील कलाकारांचा अभिनय हे सगळंच परफेक्ट आहे.

काय खटकलं?

चित्रपटाची सुरुवात खूपच संथ होते. कबीरच्या कुटुंबाचं बाँडिंग दाखवण्यातच खूप वेळ जातो. आर.माधवनच्या एन्ट्रीनंतर सिनेमात थोडा जीव येतो. या सिनेमाच्या शेवटी असणारा अजयचा मोनोलॉग खूप कंटाळवाणा वाटतो. सिनेमाचा ट्रेलर बघून तुम्हाला हा सिनेमा खूपच खतरनाक वाटला असेल आणि फक्त ट्रेलर चांगला आहे म्हणून तुम्ही हा सिनेमा बघायला जाणार असाल तर तसं करु नका, कारण तसं केलं तर तुम्ही सिनेमा पाहिल्यानंतर निराश व्हाल.एकंदरीत थिएटरमध्ये जाऊन 300-400 रुपये खर्च करण्यापेक्षा ओटीटीवर एखाद्या वीकेंडला पहावा असा शैतान हा सिनेमा आहे. या सिनेमाला मी अडीच स्टार देते, एक स्टार क्लायमॅक्ससाठी आणि दीड स्टार आर. माधवनच्या अॅक्टिंगसाठी.

Shaitan Review
The Indrani Mukerjea Story Review: असा 'डॉक्युड्रामा' यापूर्वी कधीही पाहिला नसेल, वेगवेगळी 'रहस्यं' तुम्हाला देतील धक्का!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.