Shaji Chaudhary: पूर्वी 'रामलीला' मध्ये छोटी-मोठी भूमिका करायचा 'पठाण' मधील 'राजा', रातोरात असं बदललं नशीब

'रामलीला' कार्यक्रमात काम करुन अभिनयाची आवड लागलेल्या शाजी चौधरीनं पुढे 'मैहूं ना','जोधा अकबर','पीके','तेवर' सारख्या सिनेमातून भूमिका साकारल्या आहेत.
Shaji Chaudhary In Pathaan
Shaji Chaudhary In PathaanGoogle
Updated on

Shaji Chaudhary In Pathaan: आता सगळीकडे 'पठाण' चित्रपटाचा फिवर चालू आहे. शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी 'पठाण' चित्रपट एखाद्या फेस्टिव्हलपेक्षा कमी नाही. सर्वसामान्य असोत की सेलिब्रिटी, प्रत्येकाच्या ओठावर फक्त 'पठाण' चेच नाव आहे.

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या चित्रपटाची सध्या मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. पठाण चित्रपटातील कलाकार दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम या कलाकारांनी देखील दमदार अभिनय केला आहे. शाहरुख खान, दीपिका पदुकोण जॉन अब्राहम यांच्या बरोबर अजुन एका कलाकाराचा अभिनय चर्चेत आहे तो म्हणजे शाजी चौधरी‌.

Shaji Chaudhary In Pathaan
Netflix Series चा 'हा' हिरो बनला जगातला सगळ्यात हॅंडसम पुरुष,जाणून घ्या भारतातून कोण आहे लिस्टमध्ये सामिल?

शाजी चौधरीने 'पठाण' चित्रपटात 'राजा' ही व्यक्तिरेखा साकारली आहे. आज आपण जाणून घेऊया शाजी चौधरीचा फिल्म इंजस्ट्रीतील प्रवास.

शाजीनं इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण करण्यासाठी अनेक छोट्या-छोट्या भूमिका केल्या आहेत. त्यानंतर आता कुठे जाऊन त्याला एवढ्या मोठ्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे.

शाजी चौधरीने 'रामलीला' पासून अभिनयाला सुरुवात केली होती. आणि तिथेच त्याला अभिनयाची आवड लागली. शाजी चौधरीला 'मिर्झापूर' या वेबसिरिजमधून 'मकबूल' नावाची ओळख झाली. इथपर्यंत पोहोचणे त्याच्यासाठी मोठ्या आव्हानापेक्षा कमी नव्हते.

शाजी चौधरी याचे बालपण राजस्थानातील एका छोट्या गावात गेले. तो मोठा झाल्यावर गावातील 'रामलीला' कार्यक्रमात अभिनय करू लागला. लोकांचे प्रेम आणि कौतुक मिळाल्यावर पुढे जाण्याची हिंमत मिळाली.

2003 मध्ये, तो मुंबईत आला आणि अभिनय आणि मॉडेलिंगमध्ये आपले करियर सुरू केले. मुंबईत आल्यानंतर त्यांचा संघर्ष सुरूच होता. कष्टाचे फळ मिळाले. शाजी चौधरीला 'मैं हूँ ना' आणि 'जोधा अकबर' सारख्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. शाजी 'पीके' आणि 'तेवर' सारख्या चित्रपटातही दिसला .

हेही वाचा: भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

Shaji Chaudhary In Pathaan
Aamir Khan Trolled: कार्तिक आर्यनसोबत लग्नात आमिरनं केली 'ही' हरकत..लोक म्हणू लागले,'आता हेच होतं बाकी..'
Shaji Chaudhary In Pathaan
Viral Video: ''बॉलीवूडमध्ये आपला 'उत्तराधिकारी' कोण?'', शाहरुख अन् सलमाननं कोणाचं नाव केलं फायनल?

शाजी चौधरी यानं एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, ''मला चित्रपटांमध्ये सहाय्यक नायक म्हणून काम करून खूप कंटाळा आला होता. त्याला आता अशा भूमिका करायच्या नव्हत्या. त्यामुळेच 'मिर्झापूर'मध्ये मकबूलची भूमिका मिळाल्यावर त्याने पहिल्यांदा नकार दिला. यानंतर सहदिग्दर्शकानं समजूत काढल्यावर त्यानं 'मिर्झापूर'ला होकार दिला. पुढे 'मिर्झापूर'मधील मकबूलच्या भूमिकेने तो घराघरात पोहोचला.

Shaji Chaudhary In Pathaan
The Entrepreneur: तुळजापूरात मराठीत शिकलेला प्रतिक लंडनमध्ये लोकांना नोकरीवर ठेवतोय...एका जिद्दीची कहाणी

'पठाण'मध्ये शाजी चौधरीने एका सैनिकाची भूमिका साकारली आहे, जो सतत 'पठाण'सोबत दिसतो. 'पठाण'मध्ये त्याला भले छोटा रोल भेटला, पण तो पडद्यावर दिसला तेवढा वेळ तो आपल्या दमदार अभिनयाने प्रभाव पाडताना दिसला.

अनेकांना हे यश एका रात्रीत मिळाल्याचे शाजी चौधरी सांगतात. पण प्रत्यक्षात हे 17 वर्षांच्या संघर्षाचे फळ आहे. शाजी चौधरीनं अनेक मोठ्या चित्रपटात बड्या स्टार्ससोबत काम केले आहे. पण त्याचवेळी त्याने 'पठाण' मध्ये या छोट्याशा व्यक्तिरेखेने लोकांचे लक्ष वेधून घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.