कोलंबियाची प्रसिद्ध गायिका शकीरा कर ही नेहमी तिच्या गाण्यांमुळे चर्चेत असते. तिचे प्रत्येक गाणं हे लोकप्रिय ठरत असत. मात्र, ती सध्या एक वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. तिच्यावर कर फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. इतकेच नव्हेतर तिला तुरुंगवासदेखील भोगावा लागणार अशी चर्चा रंगली आहे.
फसवणूक प्रकरणी स्पेनच्या एका न्यायालयाने गायिका शकीराचं अपील फेटाळलं आहे. यानंतर तिच्याविरुद्ध खटल्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हे प्रकरण पहिल्यांदा 2018 मध्ये चर्चेत आलं होतं.
तीन वर्षापूर्वीच जुनं प्रकरण
गायिका शकिरावर टॅक्स चोरीचे आरोप प्रकरण २०१८ मध्ये पहिल्यांदा चर्चेत आलं होत. त्यावेळी 2012 आणि 2014 दरम्यान कमावलेल्या उत्पन्नावर 14.5 दशलक्ष युरो (US$15.5 दशलक्ष) कर न भरल्याचा आरोप स्पॅनिश अभियोजकांनी गायिका शकीरावर केला होता.
या आरोपांनंतर शकीराही कोर्टात हजर झाली. जून 2019 मध्ये साक्ष देताना तिने कोणतंही गैरकृत्य केल्याचं नाकारलं. मात्र, आता तिचं अपील न्यायालयानं फेटाळलं आहे.
न्यायालयाचं म्हणणं काय...
त्यांच्याकडे पुरेसे पुरावे आहेत की, शकीराने राज्यात कर भरण्याचं तिचं कर्तव्य पूर्ण केलेलं नाही. अशा स्थितीत शकीरावर कारवाई होऊ शकते. असे न्यायालयाने म्हटले आहे.
या प्रकरणाचे मूळ पॉप गायिकेच्या घराबाबत सुरू असलेल्या अटकळींमध्ये आहे. बहामासमध्ये अधिकृत निवासस्थान असूनही ती मुख्यतः स्पेनमध्ये राहते, असं न्यायालयाने मानलं आहे.
शकीराच्या पीआर फर्मने दावा केला की, हे स्पॅनिश कर कार्यालयाकडून त्यांना माहिती मिळताच त्यांनी ताबडतोब पैसे भरले. गायिकेच्या लीगल टीमने एका विधानात म्हटलं आहे की, ती "तिच्या निर्दोष असल्याची बाजू ठामपणे मांडत राहील.
आता या प्रकरणात गायिकेवरील सर्व आरोप सिद्ध झाले आणि ती दोषी आढळल्यास तिला दंडासह तुरुंगवासाची शिक्षा तिला भोगावी लागेल अशी चर्चा रंगली आहे. मात्र, जर दोन वर्षांपेक्षा कमी कारावासाची शिक्षा झाली असेल, तर न्यायाधीश प्रथमच गुन्हा करणाऱ्यांना तुरुंगवासाची शिक्षा माफ करू शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.