Shalin Bhanot Birthday: 'MTV रोडीज 2' ते 'बिग बॉस 16' जबलपूरच्या मुलानं सोडली इंडस्ट्रीत छाप...

Shalin Bhanot Birthday
Shalin Bhanot Birthdayesakal
Updated on

शालीन भानोत सध्या 'बिग बॉस 16' या रिॲलिटी शोमुळे चांगलाच चर्चेत आहे. बिग बॉस मध्ये तो प्रकाश झोतात आला असला तरी शालीनने मनोरंजन विश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचा चाहता वर्गही तगडा आहे. तो मूलीचा लाडका आहे. शालिन आज त्यांचा 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. शालीनचा जन्म १५ नोव्हेंबर १९८३ रोजी मध्य प्रदेशातील जबलपूर येथे झाला. त्याच्या वाढदिवसानिमीत्त त्याच्या बद्दलची माहिती तुम्हाला माहित असावी...

शालीनने छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने चांगला ठसा उमटवला असला तरी त्याची स्वप्न मोठी होती. त्याने तिथ पर्यंतच मर्यादित न राहता मोठ्या पडद्यावर आणि ओटीटीवरही आपलं टॅलेंट दाखवलं आहे. 2006 मध्ये आलेल्या 'प्यारे मोहन' या चित्रपटातुन शालीनने मोठ्या पडद्यावर डेब्यू केलायं.  या चित्रपटाशिवाय त्याने 'देवदूत' आणि 'लव के फंडे' मध्येही काम केले आहे. त्याशिवाय तो 'द रेड लँड' या वेब सीरिजमध्येही काम केले आहे. शालीन सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे.

हेही वाचा: Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?

त्याच्या पर्सनल लाईफबद्दल बोलायचं झालं तर शालीनने 2009 मध्ये दलजीत कौरशी लग्न केले. हे दोघं 2006 मध्ये 'कुलवधू'च्या सेटवर भेटले होते. दोघांनीही 'नच बलिये 4' या डान्स रिॲलिटी शोमध्ये सहभाग घेतला आणि शो जिंकला. 2014 मध्ये शालीन आणि दलजीतने एका मुलाचे पालक झाले. मात्र, काही काळानंतर त्यांच्या नात्यात दुरावा वाढू लागला आणि  मूलांच्या जन्माच्या एका वर्षातच 2015 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. शालीन सध्या अभिनेत्री टीना दत्ताला डेट करत असल्याची चर्चा आहे. टीना देखील बिग बॉस 16 मध्ये सहभागी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()