RSS Dasara Melava Nagpur: "संस्कृती, परंपरा टिकवण्यासाठी RSS ने जेवढं केलं तेवढं कुणीही नाही!" शंकर महादेवन यांचे जोरदार भाषण

शंकर महादेवन यांनी RSS च्या नागपुर दसरा मेळाव्यात जोरदार भाषण केलंय
shankar mahadevan speech at rss dasara melava nagpur
shankar mahadevan speech at rss dasara melava nagpurSAKAL
Updated on

आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुर येथील प्रमुख ठिकाणी हा दसरा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी गायक शंकर महादेवन प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. संरसंघचालक मोहन भागवत यांनी उपस्थितांना संबोधित केले.

भारतीय मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी RSS च्या दसरा मेळाव्यात जोरदार भाषण केलंय. काय म्हणाले शंकर महादेवन बघा.

(shankar mahadevan speech at rss dasara melava nagpur)

shankar mahadevan speech at rss dasara melava nagpur
Kiran Mane: दसऱ्याच्या मुहुर्तावर किरण मानेंना भेटले तृतीयपंथी लोकं; म्हणाले, "माझा द्वेष करणाऱ्यांना..."

शंकर महादेवन यांनी सांगितले की, "संघाच्या विजयादशमी उत्सवाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होण्याचे आमंत्रण मिळाल्यावर अनेकांनी माझे अभिनंदनही केले. मी यासाठी भाग्यवान आहे. हा क्षण मी आयुष्यात कधीही विसरणार नाही."

शंकर महादेवन पुढे म्हणाले, 'आरएसएस परिवारातील सदस्यांनी देशासाठी जे काम केले आहे आणि करतील त्यासाठी मी फक्त त्यांचे आशीर्वाद घेऊ शकतो. आपल्या संस्कृती आणि परंपरेचे रक्षण करण्यासाठी तुमच्याइतके प्रयत्न देशातील इतर कोणीही केले नाहीत. याबद्दल मी तुमचा आभारी आहे.

महादेवन पुढे म्हणाले, "हा विश्वशांतीचा मंत्र आहे. आपला देश असा आहे की इथे प्रत्येक माणसासाठी प्रार्थना केली जाते. भारत आणि भारताच्या नागरिकांकडे आज संपुर्ण जग आदराने बघतंय. आपला भारत देश एक गाणं असेल तर RSS त्या गाण्याचे सरगम आहे"

आज RSS चा दसरा मेळावा नागपुर येथे पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन शंकर महादेवन उपस्थित होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुर येथील मुख्य कार्यालयात आज सकाळी RSS चा दसरा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शंकर महादेवन यांनी मोहन भागवत यांच्यासोबत शस्त्रपुजन केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.