Ravrambha: अभिनेता शंतनू मोघे पुन्हा महाराजांच्या भूमिकेत! चाहते आतुर.. या दिवशी संपणार प्रतीक्षा..

प्रेक्षक सुखावले, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव..
shantanu moghe agian play chhatrapati shivaji maharaj role in ravrambha movie release on 12 may cast om bhutkar
shantanu moghe agian play chhatrapati shivaji maharaj role in ravrambha movie release on 12 may cast om bhutkarsakal
Updated on

संभाजी मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अजरामर करून रसिकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलेला अभिनेता म्हणजे शंतनू मोघे. शंतनूची महाराजांच्या भूमिकेतील प्रतिमा चाहते विसर शकलेले नाहीत.

सध्या तो 'आई कुठे काय करते' या मालिके काम करत आहे तर त्याच 'सफरचंद' हे नाटक देखील रंगभूमीवर चर्चेत आहे. पण शंतनूला मात्र तु महाराजांच्या भूमिकेत कधी दिसणार याचीच विचारणा वारंवार होत होती.

अखेर ती प्रतीक्षा संपली आहे. शंतनू लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतून आपल्या भेटीला येणार आहे तेही मोठ्या पडद्यावर..

(shantanu moghe agian play chhatrapati shivaji maharaj role in ravrambha movie release on 12 may cast om bhutkar)

shantanu moghe agian play chhatrapati shivaji maharaj role in ravrambha movie release on 12 may cast om bhutkar
Bharat Jadhav: हे शहर आता.. अभिनेता भरत जाधवचा मुंबईला अखेरचा रामराम.. मुक्काम गावी हलवला.. कारण..

हिंदवी स्वराज्य उभे करताना छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांना मोलाची साथ लाभली ती म्हणजे निधड्या छातीने लढणाऱ्या शिलेदारांची. ज्यांना फक्त एकच गोष्ट ठाऊक होती ती म्हणजे आपण ‘फकस्त लढायचं, आपल्या राजासाठी अन स्वराज्यासाठी’.

इतिहास नेहमीच शौर्याने, पराक्रमाने, तर कधी कधी अनेक षडयंत्रांनी भरलेला असतो. ऐतिहासिक काळातील महान व्यक्तिरेखांवर बेतलेले सिनेमे अलीकडच्या काळात आले आणि त्याला उदंड लोकाश्रयही मिळाला.

याच यादीत एका चित्रपटाचा आपल्याला उल्लेख करावा लागणार आहे. 'रावरंभा' हा इतिहासाचा काहीसा दुर्लक्षित ‘प्रेम अध्याय’ १२ मे ला मराठी रुपेरी पडद्यावर उलगडला जाणार आहे. या चित्रपटातून अभिनेता शंतनू मोघे पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा : Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

संघर्षाच्या पार्श्वभूमीवर घडलेली रोमांचकारी प्रेमकथा या चित्रपटात पहायला मिळणार आहे. ‘ही प्रेमकथाआहे त्यागाची,समर्पणाची, प्रेमासाठी आणि स्वराज्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावायला तयार असणाऱ्या पराक्रमी रावची आणि त्यासाठी झुरणाऱ्या रंभाची’.

'रावरंभा' यांची प्रेमकथा अतिशय सुंदररीत्या चित्रपटात गुंफण्यात आली आहे. निर्माते शशिकांत शीला भाऊसाहेब पवार निर्मित आणि अनुप जगदाळे दिग्दर्शित हा चित्रपट रसिकांसाठी वेगळा रोमहर्षक अनुभव असणार आहे.

‘मुळशी पॅटर्न’मधून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता ओम भूतकर आणि सौंदर्यासोबत अभिनयाचा सुरेख मिलाफ असलेली गुणी अभिनेत्री मोनालिसा बागल या चित्रपटातून जोडीच्या रूपाने समोर येणार आहेत.

चित्रपटात छत्रपतींच्या भूमिकेत शंतनू मोघे तर प्रतापराव गुजर यांच्या भूमिकेत अशोक समर्थ दिसणार असून यांच्यासोबत संतोष जुवेकर, कुशल बद्रिके, अपूर्वा नेमळेकर, मीर सरवर, किरण माने, रोहित चव्हाण, पंकज चव्हाण, अश्विनी बागल, मयुरेश पेम, अश्विनी बागल, विनायक चौघुले, शिवम देशमुख, कुणाला मसाले, आदर्श जाधव, रुक्मिणी सुतार, शशिकांत पवार आदि कलाकारांच्या ही भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.