Shantit Kranti 2 Review: जगण्याचा आनंद घेऊन 'शांतीत क्रांती' करायला लावणारी अनोखी कहाणी

शांतीत क्रांती 2 वेबसिरीज कशी आहे? वाचा Review
shantit kranti 2 review lalit prabhakar alok rajwade abhay mahajan tvf sony liv
shantit kranti 2 review lalit prabhakar alok rajwade abhay mahajan tvf sony livSAKAL
Updated on

शांतीत क्रांती वेबसिरीज चांगलीच लोकप्रिय झाली. शांतीत क्रांतीच्या पहिल्या सिझनने प्रेक्षकांचं चांगलं प्रेम मिळालं. याच लोकप्रिय झालेला शांतीत क्रांतीचा दुसरा सिझन आज रिलीज झालाय. कसा आहे शांतीत क्रांती 2 जाणून घ्या.

(shantit kranti 2 review lalit prabhakar alok rajwade abhay mahajan tvf sony liv)

shantit kranti 2 review lalit prabhakar alok rajwade abhay mahajan tvf sony liv
Tiger 3 Released Date: अखेर सलमानच्या टायगर 3 ची रिलीज डेट समोर, पहिला हिंदी सिनेमा जो रविवारी प्रदर्शित होणार

शांतीत क्रांती 2 ची कथा काय ?

शांतीत क्रांती 2 ची कथा पहिल्या भागाला पुढे घेऊन जाते. सिनेमाची सुरुवात सुरू होते एका रखरखीत वाळवंटातून. जिथे प्रसन्न (ललित प्रभाकर), श्रेयस (अभय महाजन) दोघे बेशुद्ध अवस्थेत असतात. पुढे त्यांना दिनार (आलोक राजवाडे) उठवतो. आलोकच्या हातात एक बाळ असतं. हे बाळ असतं प्रसन्नचं.

हो तुम्ही बरोबर वाचताय. मागच्या सिझनमध्ये बाप बनण्यास तयार झालेला पश्या आता बाप झालाय. आता हे तिघे वाळवंटात काय करत आहेत याचं उत्तर शोधतानाच कहाणी फ्लॅशबॅकमध्ये जाते.

जिथे दिसतं प्रसन्न कुटुंबवत्सल बाप झालाय. पण त्याची बायको निशीला (मृण्मयी गोडबोले) मात्र तो आता कंटाळवाणा नवरा वाटतो. श्रेयस आता अरेंज मॅरेज पद्धतीने लग्न करायला तयार झालाय. तर दिनार मात्र सर्व व्यसनं सोडून अध्यात्माच्या मार्गाला लागलाय.

हे तिघे श्रेयसच्या एका इव्हेंटला एकत्र येतात. तिघेही एकमेकांसमोर मन मोकळं करतात. रात्रभर ड्रिंक्स करतात. आणि मग होतो एक गोंधळ. हे तिघे थेट एका अध्यात्मिक ट्रॅव्हल टूरमध्ये जातात. पण कसे? पुढे काय होतं? तिघांचं आयुष्य सुरळीत होतं की आणखी बिघडतं? हे पाहण्यासाठी तुम्हाला शांतीत क्रांती 2 बघावी लागेल.

शांतीत क्रांती 2 का पाहावा?

शांतीत क्रांती 2 ची जमेची बाजू म्हणजे पुन्हा एकदा एक उत्तम ट्रॅव्हल स्टोरी. काहीशी गुंतागुंतीची कथा ट्रॅव्हल कथेत चांगली गुंफण्यात आली आहे. याशिवाय अध्यात्मिक दृष्टिकोनात जगण्याचा अर्थ उलगडण्यात आलाय. याशिवाय अनेक कठीण संकल्पना सोप्या करून उलगडण्यात आलाय. याशिवाय प्रसंगानुरुप असलेली विनोदनिर्मिती खळखळून हसवते. याशिवाय भारतातल्या अनोख्या धार्मिक स्थळांची सफर शांतीत क्रांती 2 घडवून आणते.

shantit kranti 2 review lalit prabhakar alok rajwade abhay mahajan tvf sony liv
Gadkari Movie: हा अभिनेता साकारणार नितीन गडकरींची भूमिका, नवीन पोस्टरमधून झाला खुलासा

शांतीत क्रांती 2 च्या खटकणाऱ्या गोष्टी

शांतीत क्रांती 2 ची खटकणारी गोष्ट म्हणजे पहिल्या सिझनच्या तुलनेत हा सिझन वेगवान नाही. मूळ कथा सुरू व्हायलाच वेळ लागतो. त्यामुळे पाहताना काहीसा रसभंग होतो. सारंग साठ्ये, पॉलाचं दिग्दर्शन खुप छान. मूळात ट्रिपलींग या वेबसिरीजसारखा प्रयोग मराठीत होणं हीच फार कौतुकास्पद गोष्ट म्हणावी लागेल.

सर्व कलाकारांनी चांगलं काम केलंय. आलोक राजवाडे, ललित प्रभाकर, अभय महाजन, मृण्मयी गोडबोले अशा अनेक कलाकारांनी पुन्हा एकदा त्यांच्या अभिनयाने शांतीत क्रांती 2 मध्ये धम्माल आणली आहे. इतर सहकलाकारांनी सुद्धा त्यांना चांगली साथ दिली आहे. अशाप्रकारे शांतीत क्रांती 2 काहीशी संथ असली तरी एकदा अनुभवण्यासारखा धम्माल प्रवास आहे यात शंका नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.