Sharad Ponkshe: सध्या राज्यसह देशातील राजकीय वातावरण प्रचंड गढूळ झालेलं आहे. गांधी आणि सावरकर या राजकारणातील एक ज्वलंत विषय झालेला आहे. दोन्ही महापुरुषांचे समर्थक आपापल्या विचारधारेला प्रमाण मानून तूफान राडेबाजी करत आहेत. त्यामुळे राजकीय आखाड्यात रोज डाव पाहायला मिळत आहे.
पंतप्रधान मोदींवर त्यांच्या आडनावाचा दाखला देत टीका केली म्हणून सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना २ वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभेने काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली आहे. त्यानंतर राहुल गांधी यांना माफी मागा असे सांगण्यात आले. पण 'माफी मागायला मी काही सावरकर नाही.. गांधी आहे.. आणि गांधी कधीही झुकत नाही' असे विधान राहुल गांधी यांनी केले होते.
(sharad ponkshe shared photo of his 102 year old grandmother who participate in bjp veer savarkar gaurav yatra)
यावरून देशभरात बराच कोलाहल सुरू आहे. राहुल गांधी यांचा तीव्र निषेध सुरू आहे. याच संदर्भात भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांनी वीर सावरकर गौरव यात्रेचे आयोजन केले आहे. याच यात्रेतील एक फोटो पोस्ट करत शरद पोंक्षे यांनी सावरकरांचे विचार आणि त्यामुळे मिळणारी ऊर्जा किती मोठी आहे, हे दाखवले आहे.
या गौरव यात्रेत अभिनेते शरद पोंक्षे यांच्या १०२ वर्षांच्या आजीनेही सहभाग घेतला आहे. शरद पोंक्षेंनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. ते म्हणाले आहेत की, ''माझी आजी (श्रीमती ईंदिरा भट)वय १०२ वर्षे सावरकर गौरव यात्रेत सहभागी झाली मिरज येथे.''
शरद पोंक्षे यांच्या पोस्ट नंतर त्यांच्या आजीचे खूप कौतुक केले जात आहे. सोशल मीडियावरही पोंक्षे यांच्या चाहत्यांनी ''आम्ही सारे सावरकर'' म्हणत कमेंट केल्या आहेत.
अभिनेते शरद पोंक्षे यांची वादग्रस्त विधाने आणि राजकीय मतं यामुळे सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे लागलेले असते. अभिनया सोबतच हिंदुत्व आणि सावरकर या विषयावर राज्यभरात व्याख्यान देत असतात. त्यामुळे ते कट्टर हिंदुत्ववादी आणि सावरकरप्रेमी आहेत त्यामुळेच त्यांचा भाजपच्या सावरकर गौरव यात्रेला पूर्ण पाठिंबा आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.