Sharad Ponkshe: सध्या गांधी आणि सावरकर या राजकारणातील एक ज्वलंत विषय झालेला आहे. दोन्ही महापुरुषांचे समर्थक आपापल्या विचारधारेला प्रमाण मानून तूफान राडेबाजी करत आहेत. त्यामुळे राजकीय आखाड्यात रोज डाव पाहायला मिळत आहे.
पंतप्रधान मोदींवर टीका केली म्हणून सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना २ वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभेने काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली आहे. त्यानंतर राहुल गांधी यांना माफी मागा असे सांगण्यात आले. पण 'माफी मागायला मी काही सावरकर नाही.. गांधी आहे.. आणि गांधी कधीही झुकत नाही' असे विधान राहुल गांधी यांनी केले होते.
यावरून देशभरात बराच कोलाहल सुरू आहे. त्यात भाजप आणि शिंदे गट शिवसेना यांनी सावरकर गौरव यात्रेचेही आयोजन केले आहे. अशातच शरद पोंक्षे यांनी एक व्हिडिओ शेयर करत कॉँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
Sharad Ponkshe shared video about swatantryaveer savarkar congress party slams rahul gandhi
शरद पोंक्षे यांनी आपल्या भाषणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला आहे. हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये पोंक्षे यांनी सावरकर नावाची दहशत अजूनही संपली नाही असे म्हंटले आहे. शिवाय राहुल गांधींशी दोन हात करायला आम्ही पुरे आहोत असा इशाराही त्यांनी दिला आहे.
पोंक्षे म्हणतात, '' संपूर्ण हिंदुस्तानच्या त्यावेळच्या ३६ करोंड लोकांना सगळ्यात कोण डेंजरस वाटत होतं तर विनायक दामोदर सावरकर. आज स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाली तरीही कॉँग्रेसला मोस्ट डेंजरस माणूस कोण वाटतो तर विनायक दामोदर सावरकर..''
हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?
''आता ते गेलेत खरं तर, पण त्यांच्या नावाचीही एवढी दहशत आहे की, त्यांच्या बद्दल चांगलं बोलायला लागलं, ते जर पसरायला लागले, ते जर लोकप्रिय व्हायला लागले, त्यांचे विचार कळायला लागले आणि त्यातून जर दहा सावरकर निर्माण झाले तर काय करायचं. एक सावरकर अख्ख्या ब्रिटिश साम्राज्याला पुरून उरला तर हे दिल्लीतलं शेंबडं पोरगं काय आहे..त्याला आम्हीच पुरून ऊरु, सावरकरांची गरज नाही.'' असे ते म्हणाले आहेत.
हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत असून, ''आधी ब्रिटीश व नंतर कॉंग्रेस सतत सावरकर नावाला का घाबरतात?'' असे कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.