Sharad Ponkshe: तर हातात शस्त्र घ्यावचं लागेल.. शरद पोंक्षे यांचे घणाघाती वक्तव्य..

अभिनेते आणि सावरकरवादी विचारांचे पुरस्कर्ते शरद पोंक्षे यांचे धारधार विधान नेमके कुणासाठी?
Sharad Ponkshe shared video he talks about patriotism hinduism and controversial statement
Sharad Ponkshe shared video he talks about patriotism hinduism and controversial statementsakal
Updated on

sharad ponkshe: मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते शरद पोंक्षे सध्या बरेच चर्चेत आहेत. त्यांची वादग्रस्त विधाने आणि राजकीय मतं यामुळे सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे लागलेले असते. ते स्वतः समाज माध्यमांवर सक्रिय असतात. इतकच नाही तर ते अनेक सामाजिक आणि राजकीय विषयावर निर्भीडपणे भाष्यही करत असतात. पोंक्षे यांचे विचार, हिंदुत्वाप्रती असलेलं प्रेम आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर असलेली निष्ठा सर्वांनाच माहीत आहे. शरद पोंक्षे राष्ट्रप्रेमावर व्याख्यान देत असतात. त्यांच्या एका व्याख्यानातला व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी अहिंसा आणि शस्त्र हातात घेण्यातील फरक विषद केला आहे.

(Sharad Ponkshe shared video he talks about patriotism hinduism and controversial statement)

Sharad Ponkshe shared video he talks about patriotism hinduism and controversial statement
Bigg Boss Marathi 4: ज्या हॉटेलमध्ये एक रात्र राहिले तिथल्या कर्मचाऱ्यांनी.. तेजस्विनी लोणारीला आला हा अनुभव..

या व्हिडिओमध्ये शरद पोंक्षे म्हणाले आहेत, 'इतिहास जर तुम्ही वाचलात.. तर तुमच्या लक्षात येईल, इतिहास हा नेहमी जेत्यांचा असतो. परभूतांना इतिहास नसतो. परभूतांचा कधीही कुणीही इतिहास लिहीत नाही. परभूतांना भविष्य नसतं, वर्तमान नसतं आणि भूतकाळही नसतो, असं टॉलस्टॉयने म्हणून ठेवलं आहे. पण जेत्यांना ते असतं. बाकी शांती, अहिंसा हे जे आदर्श दाखवले जातात ना ते पोवाड्यांमध्ये, गाण्यांमध्ये बरे वाटतात.'

Sharad Ponkshe shared video he talks about patriotism hinduism and controversial statement
Hardeek Akshaya Wedding: अखेर तुझ्यात जीव रंगलाच! हार्दिक अक्षया अडकले लग्नाच्या बेडीत..

पुढे ते म्हणाले, 'जर राष्ट्राची निर्मिती करायची असेल तर हातात शस्त्रच असावं लागतं. शास्त्राशिवाय पर्याय नाही.' त्यांचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.

शरद पोंक्षे सध्या 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेत प्रमुख भूमिकेत आहेत. याशिवाय नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'हर हर महादेव' चित्रपटातही ते होते. अभिनया पलीकडे ते राष्ट्रप्रेमासाठी काम करतात. त्यासाठी ते व्याख्यान देत गावोगाव फिरत असतात. त्यांच्या व्याख्यानाच्या व्हिडिओ सोशल मिडियावर बऱ्याच चर्चेत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.