Sharad Ponkshe: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती विपुल अमृतलाल शाह यांच्या 'द केरल स्टोरी' या चित्रपटाची. लव जिहादच्या नावाखाली महिलांचे होणारे शोषण आणि सद्यस्थिती सारख्या विषयाला चित्रपटातून वाचा फोडण्यात आली आहे. एका अत्यंत वेगळ्या विषयावरील मांडणी करत शाह यांनी हा चित्रपट आहे.
या चित्रपटाला बराच विरोधही झाला. एक गट या चित्रपटाच्या समर्थनार्थ ठाम उभा राहिला तर दुसरा गट या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी करत होता. पण अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाला असून दमदार कमाई करत आहे.
अभिनेते शरद पोंक्षे यांनी मध्यंतरी हा चित्रपट पाहून तो सर्वांनी पहावा असे आवाहन केले होते. आता त्यांनी पुन्हा एक व्हिडिओ शेयर केला आहे. या व्हिडिओ मध्ये त्यांनी 'द केरला स्टोरी' चा आधार घेऊन हिंदूंची चांगलीच कानउघडणी केली आहे.
(sharad ponkshe shares video about the kerala story love jihad hinduism swatantrya veer savarkar thoughts)
या व्हिडीओमध्ये शरद पोंक्षे हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेले ''काळे पाणी'' हे पुस्तक वाचत बसले आहेत. आणि पुस्तक वाचत असतानाच ते प्रेक्षकांसाठी संवाद साधू लागतात. ते म्हणतात, ''काय बघताय.. मी काय वाचतोय.. ;काळे पाणी'.. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेली ‘काळे पाणी’ ही कादंबरी.. सध्या जे सुरू आहे.. म्हणजे 'द केरला स्टोरी' पाहून सगळे हिंदू जागे झाले आहेत.''
''पण सावरकर गेली सव्वाशे वर्षे हिंदूंना जागृत करण्यासाठी धडपडत आहेत. १९६६ मध्ये ते गेले, पण आमच्यासारख्या व्याख्यात्यांच्या माध्यमातून आम्ही सावरकर मांडायचा प्रयत्न करतो. सावरकरांनी संपूर्ण आयुष्य हिंदू धर्म आणि हिंदुत्वासाठी वेचलं. तरीही हिंदू एक होत नाहीये.''
पुढे शरद पोंक्षे म्हणतात, ''अजूनही जागा होत नाहीये यासारखं दुःख नाहीय. ऐकू या सावरकर, वाचू या सावरकर. आपण सगळ्यांनी एक होऊ या. हिंदू धर्मातील सर्व जाती संपवून हिंदू ही एकमेव जात निर्माण करू या. हेच या माणसाने स्वप्न पाहिले. ते आपण पूर्ण करू या.'' अशा शब्दात त्यांनी तमाम हिंदूंचे कान टोचले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.