Sharad Ponkshe: "हिंदी राष्ट्रवाद जो काँग्रेसनं स्वीकारला..."; शरद पोंक्षेंच्या व्हिडीओनं वेधलं लक्ष

Sharad Ponkshe: नुकताच शरद पोंक्षे यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शरद पोंक्षे हे राष्ट्रीय गीताबाबत आणि काँग्रेसबाबत बोलताना दिसत आहेत.
Sharad ponkshe
Sharad ponksheesakal
Updated on

Sharad Ponkshe: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) हे त्यांच्या अभिनयानं अनेकांची मनं जिंकतात. तसेच शरद पोंक्षे हे स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्याबाबत विविध ठिकाणी व्याख्यान देतात. या व्याख्यानाचे व्हिडीओ ते सोशल मीडियावर शेअर करतात. नुकताच शरद पोंक्षे यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शरद पोंक्षे हे राष्ट्रीय गीताबाबत आणि काँग्रेसबाबत बोलताना दिसत आहेत. शरद पोंक्षे यांच्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

काय म्हणाले शरद पोंक्षे?

शरद पोंक्षे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ते एका कार्यक्रमात बोलताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये शरद पोंक्षे म्हणतात, "वंदे मातरम आणि जनगणमन हे आपलं राष्ट्रगीत. पण जे राष्ट्रगीत व्हायला हवं होतं, ज्याला राष्ट्रगीताचा दर्जा मिळायला हवा होता, ते आज दुर्दैवाने 'राष्ट्रीय गीत' झालंय. मी जे परवाच्या व्याख्यानामध्ये तुम्हाला हिंदी राष्ट्रवाद सांगितला, जो काँग्रेसने स्वीकारला. मुळात ब्रिटिशांनी राष्ट्रीय काँग्रेसची उभारणीच हिंदी राष्ट्रवादावर केली. जेणेकरून कधीही राष्ट्रीय काँग्रेस पूर्ण स्वातंत्र्याची मागणीच करू शकणार नाही. हा हिंदी राष्ट्रवाद हा हिंदू-मुस्लिम एकतेचं प्रतिक मानला गेला आणि त्याच्या पुढे जाऊन जे परिणाम भारताला भोगावे लागले. त्यातला सगळ्यात पहिला परिणाम कोणाला भोगावा लागला असेल तर तो वंदे मातरम् या बंकिमचंद्र चटर्जी यांच्या गीताला"

शरद पोंक्षे यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "वंदे मातरम्"

पाहा व्हिडीओ:

Sharad ponkshe
Sharad Ponkshe : पूर्वी ब्राह्मण विरोधात बहुजन असा वाद निर्माण केला होता, पण आता..; काय म्हणाले शरद पोंक्षे?

शरद पोंक्षे यांच्या मालिका आणि चित्रपट

शरद पोंक्षे यांचा ‘ही अनोखी गाठ’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. तसेच सुपरहिट ठरलेल्या 'बाई पण भारी देवा' या चित्रपटात देखील शरद पोंक्षे यांनी काम केलं आहे. शरद पोंक्षे यांनी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे.आभाळमाया, वादळवाट, ठिपक्यांची रांगोळी,दार उघड बये या मालिकेत शरद पोंक्षे यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.