Sharad ponkshe trolled reservation patriotism after daughter became pilot
Sharad ponkshe trolled reservation patriotism after daughter became pilotSAKAL

शरद पोंक्षे 'आरक्षणावर' घसरले नेटकऱ्यांनी वाजवले, लेक पायलट झाल्यावर केलेल्या पोस्टवरुन नेटकऱ्यांचा संताप| Sharad Ponkshe

शरद पोंक्षेंनी आरक्षणाचा मुद्दा काढलेलं नेटकऱ्यांना आवडलं नाहीय
Published on

Sharad Ponkshe News: शरद पोंक्षे हे मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीचे अभिनेते. शरद पोंक्षे त्यांच्या सोशल मिडीयावर विविध सामाजिक आणि राजकीय घटनांवर टीकाटिप्पणी करत असतात. शरद पोंक्षे यांची लेक सिद्धी पायलट झाली.

त्यानिमित्ताने शरद पोंक्षे यांनी लेकीचं अभिनंदन करताना आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केलेला. पण याच मुद्दयावर नेटकऱ्यांनी मात्र शरद पोंक्षे यांच्यावर चांगलीच आगपाखड केलीय

(Sharad ponkshe trolled reservation patriotism after daughter became pilot)

Sharad ponkshe trolled reservation patriotism after daughter became pilot
Tejashri Pradhan: तेजश्री प्रधानची नवी मालिका.. काय आहे मालिकेचं नाव? कधीपासुन सुरु होणार? जाणुन घ्या

पोंक्षे 'आरक्षणावर' घसरले! नेटकऱ्यांनी वाजवले

"Congrats 🎉 पण कमर्शिअल पायलट मध्ये कुठून आलं आरक्षण ? आणि देशसेवेचा काय संबंध ?"

"साधारण 2000 वर्षे शिक्षणाचा निवडक अधिकार, आरक्षण, एकाच समाजाला होतं. ह्या पेक्षा मोठं आरक्षण असूच शकत नाही कोणत्याही समाजासाठी. असो."

"सिध्दी बेटा तुझे हार्दीक अभिनंदन ,परंतु तुझ्या बापाला आरक्षण वाले डोळ्याला खुपतात याचे वाईट वाटते ,आरक्षण घेणारे झोपडपट्टीत राहूनही कलेक्टर होतात आणि कलेक्टर होण्यासाठी फक्त आरक्षणच नव्हे तर बुद्धिमत्ता ही लागते."

"अबे Sharad Ponkshe डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जर मनुस्मृती जाळली नसती तर तुझी लेक आज pilot झाली नसती."

अशा कमेंट करत नेटकऱ्यांनी शरद पोंक्षेंची चांगलीच शाळा घेतलीय.

काय होती शरद पोंक्षेंची पोस्ट?

शदर पोंक्षे यांनी सोशल मिडीयावर लेक पायलट झाल्याची पोस्ट शेयर करत म्हटले, सिध्दी शरद पोंक्षे आज पायलट झाली. इयत्ता ४ पासून तिने पाहीलेलं स्वप्न पुर्ण झालं.

अत्यंत खडतर परीस्थितीतून,माझं आजारपण,कोरोना, लॉकडाऊन, आर्थिक स्थिती बिकट हे सगळे अडथळे तिनं पार केले आहेत. बॅकेचं कर्ज काढून,कोणतीही सवलत,आरक्षण नसताना केवळ मेहनत ,बुध्दीमत्ता ,परिश्रम व निष्ठा या जोरावर ती पायलट झाली.

Sharad ponkshe trolled reservation patriotism after daughter became pilot
हे बॉलीवूड कपल नाही तर मराठमोळे प्रसाद जवादे - अमृता देशमुख आहेत

लेकीचं केलं अभिनंदन

शरद पोंक्षे यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, बापाला आणखी काय हवं नाही का? आज अभिमान अभिमान फक्त अभिमान वाटतोय तूझा सिध्दी. मोठी हो पुढे देशाची सेवा कर. उत्तम सेवा दे. करशिलच खात्रीच आहे. लव यू बाळा. पोंक्षे यांच्या त्या पोस्टवर चाहत्यांनी, नेटकऱ्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे.

एकुणच शरद पोंक्षे यांची लेक पायलट झाली याचा सर्वांना आनंद आहेच. पण पोंक्षेंनी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केल्याने नेटकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.


ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.