Shark Tank India : व्यवसाय खड्ड्यात गेला होता; पण एक एपिसोड अन् ४८ तासांत झाला चमत्कार

या उद्योजकाचा चांगला चालत असलेल्या व्यवसाय कोरोनामुळे डबघाईला आला होता.
shark Tank India
shark Tank IndiaSakal
Updated on

शार्क टँक इंडिया हा शो चांगलाच प्रसिद्ध आहे. आता याचा दुसरा भागही आला असून या शोमुळे एका उद्योजकाचा बुडीत गेलेला उद्योग सावरला आहे. कशी झाली ही कमाल?

शार्क टँक इंडिया या शोचा आता दुसरा सिझन आला आहे. या शोमध्ये व्यवसाय, गुंतवणूक आणि व्यवसाय करणाऱ्यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी कथा समोर येतायत. अशीच एक कथा आहे उद्योजक गणेश बालकृष्णन यांची. शार्क टँकमध्ये आल्यापासून केवळ ४८ तासांमध्ये त्यांचा तोट्यात गेलेला उद्योग भरभराटीला लागला आहे.

हेही वाचा - गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

गणेश बालकृष्णन यांनी २०१९ मध्ये फ्लॅटहेड्स शूज नावाची कंपनी स्थापन केली होती. त्यांचा हा व्यवसाय चांगला सुरू होता. पण कोरोना काळामध्ये त्यांना मोठा तोटा सहन करावा लागला. हा व्यवसाय बुडण्यापासून वाचवण्यासाठी त्यांनी दोन महिन्यांत ३५ लाख रुपये खर्चत केले. पण तरीही हा व्यवसाय बुडतच चालला होता. यामुळेच गुंतवणूक मिळवण्यासाठी ते शार्क टँक इंडियामध्ये आले होते. पण त्यांना शार्क्सकडून गुंतवणूक मिळाली नाही.

असं असलं तरी सोशल मीडियावरुन मात्र बालकृष्णन यांना भरपूर पाठिंबा मिळाला. याचा परिणाम असा झाला की फक्त ४८ तासांमध्येच त्यांचा सगळा माल खपला. बालकृष्णन यांनी स्वतः ही माहिती दिली. बालकृष्णन यांनी आयआयटी आणि आयआयएम मधून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यांनी सात वर्षे विविध कॉलेजेसमध्ये मार्केटिंगचं शिक्षणही दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.