Sharmila Tagore Bollywood Actress Amitabh Bachchan : प्रसिद्ध अभिनेत्री शर्मिला टागोर या नेहमीच त्यांच्या अभिनयामुळे अन् त्यांच्या परखड वक्तव्यामुळे चर्चेत राहिल्या आहेत. गेल्या चार दशकांहून अधिक काळ त्यांनी आपल्या अभिनयानं चाहत्यांची मनं जिंकून घेतली आहे. शर्मिला टागोर यांच्या अभिनयाची राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली आहे.
काही दिवसांपूर्वी शर्मिलाजी या करण जोहरच्या कॉफी विथ करण नावाच्या शो मध्ये सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी त्यांच्या चित्रपट प्रवासाविषयी सांगत असताना दुसरीकडे लाडका लेक सैफ अली खानच्या आयुष्यातील अनेक गुपितंही सांगितली होती. सैफचं लग्न, त्याचे अफेयर्स, यावर त्यांनी केलेली कमेंट ही सोशल मीडियावर चर्चेत आली होती.
आता बिग बी अमिताभ बच्चन यांनी देखील शर्मिला टागोर यांच्याविषयीची एक आठवण सांगून चाहत्यांना धक्का दिला आहे. असं म्हटलं जातं की, शर्मिला टागोर यांचे नृत्य पाहण्यासाठी फ्रान्समध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. पद्मभुषण पुरस्कार विजेत्या शर्मिलाजी यांनी आतापर्यत विविध भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यात उल्लेख करायचा झाल्यास, कश्मिर की कली, वक्त, अनुपमा, आमने सामने, आराधना, सत्यकाम, अमर प्रेम, दाग, चुपके-चुपके, मौसम या चित्रपटांचे नाव घ्यावे लागेल.
आयएएनसच्या एका रिपोर्टनुसार, ७९ वर्षीय शर्मिला टागोर या त्यांची नात सारा अली खान सोबत केबीसीच्या फिनाले एपिसोडमध्ये आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी सांगितलेली आठवण चर्चेत आली आहे. अमिताभ यांनी म्हटलं की, मला वाटतं तुम्हाला इव्हिनिंग इन पॅरिस आठवत असेल. तेव्हा शर्मिला म्हणाल्या, मी पारंपरिक वेशभूषा करुन चॅप्स एलिसीसवर डान्स करत होते. तेव्हा मला आठवतंय की, त्या भागातली ट्रॅफिक थांबवण्यात आली होती.
शर्मिला टागोर यांचा तो डान्स पाहण्यासाठी फ्रान्समधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. इव्हिनिंग इन पॅरिसविषयी सांगायचे झाल्यास तो १९६७ मध्ये प्रदर्शित झाला होता. शक्ति सामंत यांनी त्याचे दिग्दर्शन केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.