Shashank Ketkar : 'एवढ्याशा पैशात घर कसं चालणार'? शशांकचा प्रश्न

शशांकनं यापूर्वी देखील त्याच्या आतापर्यतच्या प्रवासाविषयी चाहत्यांना सांगितले आहे.
Shashank Ketkar Marathi Actor Share Payemet
Shashank Ketkar Marathi Actor Share Payemetesakal
Updated on

Shashank Ketkar Marathi Actor Share Payemet : मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेता म्हणून शशांकचे नाव घेतले जाते. त्याच्या चित्रपट, मालिका आणि नाटक याला प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद मोठा आहे. शशांक हा नेहमीच त्याच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियांमुळे चर्चेत असतो. आता त्यानं एका मुलाखतीमुळे चाहत्यांचे, नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

शशांकनं यापूर्वी देखील त्याच्या आतापर्यतच्या प्रवासाविषयी चाहत्यांना सांगितले आहे. करिअरच्या सुरुवातीला नाटक, मालिकांमध्ये मिळणारे काम आणि त्याचे मानधन याबाबत त्यानं मोकळेपणानं त्या मुलाखतीतून सांगितले आहे. पहिल्यांदा मानधन म्हणून मिळणारे पैसे त्यात खर्च कसा भागवायचा हा मोठा प्रश्न होता. असे शशांकनं त्या मुलाखतीतून सांगितले आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांना मिळणारं मानधन हा प्रेक्षकांचा आणि संबंधित कलाकारांच्या चाहत्यांचा नेहमीच उत्सुकतेचा विषय असतो. त्याबाबत चर्चाही होत असते. अशावेळी काही कलाकारांनी केलेलं भाष्य बराच काळ चर्चेचा विषयही होता. आता शशांकनं त्याचा अनुभव प्रेक्षकांना सांगितला आहे.

शशांकनं मित्र म्हणे या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली असून त्यानं त्याला सुरुवातीच्या काळात मिळणारं मानधन याविषयी काही अनुभव सांगितले आहे. शशांक म्हणतो की, मालिकांच्या माध्यमातून तुम्ही घरोघरी पोहचता. प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतो. होणार सून मी या घरची ही माझी सहावी मालिका आहे. मालिका करताना तुम्हाला किमान वीस ते पंचवीस दिवस काम मिळणार आहे हे माहिती असते.

आता महिन्याचे एवढे दिवस काम केल्यावर तुम्हाला किती पैसे मिळणार याविषयी तुम्हाला ठाऊक असते. माझी सुरुवात बाराशे रुपयांपासून झाली. आता मी एका ठराविक मानधनापर्यत आलो आहे. तेव्हा जे पैसे मिळत होते त्यात घर चालवणं अवघड होतं. आता सगळे काही सुरळीत आहे. अशा शब्दांत शशांकनं त्याचे अनुभव सांगितले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.