Shastry Virudh Shastry: परेश रावल यांचा 'शास्त्री विरुद्ध शास्त्री' प्रदर्शित होणारच! तारीख ठरली विरोध टळला
Shastry Virudh Shastry Paresh Rawal hindi movie : प्रसिद्ध अभिनेते परेश रावल यांचा शास्त्री विरुद्ध शास्त्री नावाचा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आला होता. आता त्याच्याशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. साउथची अॅक्ट्रेस मिमी चक्रवर्तीची यात महत्वाची भूमिका आहे.
नंदिता रॉय शिबोप्रसाद मुखर्जी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही घोषित केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या चित्रपटावरुन मोठा वादही झाला होता. त्यामुळे त्याची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. परेश रावल यांची या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका आहे. बऱ्याच दिवसांनी परेशजी पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेतून समोर येत आहेत.
यापूर्वी आयुषमान खुराना, अनन्या पांडे यांच्या ड्रीम गर्ल २ मध्ये देखील परेश रावल यांनी महत्वाची भूमिका साकारली होती. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयानं चाहत्यांचे मनोरंजन करणाऱ्या परेश रावल यांनी वेगळी ओळख चाहत्यांच्या मनात तयार केली आहे. त्यांच्या शास्त्री विरुद्ध शास्त्री नावाच्या चित्रपटाची चर्चा रंगली होती. त्याबाबत एक मोठी बाब समोर आली आहे.
अभिनेता परेश रावल आणि खासदार मिमी चक्रवर्ती यांच्या मुख्य भूमिका असलेला शास्त्री विरुद्ध शास्त्रीच्या नव्या रिलिज डेटची घोषणा करण्यात आली आहे. २०१७ मध्ये आलेल्या पोस्टो या चित्रपटाचा हिंदी रिमेक म्हणून शास्त्री विरुद्ध शास्त्रीकडे पाहिले जात आहे. त्याचे दिग्दर्शन नंदिता रॉय आणि शिबोप्रसाद मुखर्जी यांनी केले आहे. त्यांनीच बंगाली पोस्टो या चित्रपटाचे देखील दिग्दर्शन केले होते.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ३ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये नीना कुलकर्णी यांची महत्वाची भूमिका आहे. ही अशा एका तरुणाची गोष्ट आहे, ज्यात तो आई वडिल आणि आजी-आजोबांच्या भांडणात भरडला जातो. ही लढाई कायदेशीर पद्धतीनं सुरु आहे. एका वेगळ्या विषयावर हा चित्रपट भाष्य करतो असे दिसून आले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.