Shastry VS Shastry Official Trailer Paresh Rawal : बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते परेश ऱावल हे नेहमीच त्यांच्या वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत राहिले आहे.त्यांचा अभिनय चाहत्यांच्या खास कौतुकाचा विषय राहिला आहे. रोड टू संगम, सरदार वल्लभभाई पटेल, हेरा फेरी, ओएमजी सारखे चित्रपट ज्यांनी पाहिले आहेत त्यांना परेश रावल काय ताकदीचे अभिनेते आहेत हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
आता परेश रावल यांचा शास्त्री विरुद्ध शास्त्री नावाचा चित्रपट येत्या तीन नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आता प्रदर्शित झाला असून त्यावरुन चर्चेला सुरुवात झाली आहे. एका आगळ्या वेगळ्या विषयाला वाचा फोडण्याचे काम या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. आजोबानं नातवाच्या कस्टडीसाठी चक्क मुलाच्या विरोधात कोर्टानं धाव घेतली आहे. हिंदी चित्रपटांमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारच्या विषयांना स्थान देण्यात आले आहे.
गेल्या काही वर्षांपासून विभक्त कुटूंबांची संख्या वाढत आहे. ज्या एकत्र कुटुंब पद्धतीसाठी भारतीय समाजाची ओळख होती त्याचे स्वरुप पूर्णपणे बदलून गेल्यानं त्याचा परिणाम आताच्या पिढीवर कशाप्रकारे होतो आहे हे प्रभावीपणे दिग्दर्शकानं शास्त्री विरुद्ध शास्त्री या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानं ट्रेलरमधून संभाव्य परिणाम आणि धोके यांची जाणीव प्रेक्षकांना करुन दिली आहे.
नंदिता रॉय शिबोप्रसाद मुखर्जी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही घोषित केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या चित्रपटावरुन मोठा वादही झाला होता. त्यामुळे त्याची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. परेश रावल यांची या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका आहे. बऱ्याच दिवसांनी परेशजी पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेतून समोर येत आहेत.
साउथची अॅक्ट्रेस मिमी चक्रवर्तीची यात महत्वाची भूमिका आहे. यापूर्वी आयुषमान खुराना, अनन्या पांडे यांच्या ड्रीम गर्ल २ मध्ये देखील परेश रावल यांनी महत्वाची भूमिका साकारली होती. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयानं चाहत्यांचे मनोरंजन करणाऱ्या परेश रावल यांनी वेगळी ओळख चाहत्यांच्या मनात तयार केली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.