Shehnaz Gill On Women Bill : 'हे जे काय केलंय ते....' संसदेतील महिला आरक्षणावर काय म्हणाली शहनाज गिल?

प्रसिद्ध अभिनेत्री आणि सेलिब्रेटी शहनाज गिलनं तिच्या प्रतिक्रियेमध्ये संसदेतील महिला आरक्षणाबाबत दिलेली प्रतिक्रिया नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
Women's Reservation Bill | Actress Shehnaaz Gill says
Women's Reservation Bill | Actress Shehnaaz Gill saysesakal
Updated on

Women's Reservation Bill | Actress Shehnaaz Gill says: देशभरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या विधेयकाची घोषणा केली त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. त्यात बॉलीवूडच्या काही सेलिब्रेटींनी देखील त्या विधेयकाचे नाव नारीशक्ती वंदन अधिनियम असे आहे. त्याचे सगळीकडे कौतुक होताना दिसत आहे. (लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

प्रसिद्ध अभिनेत्री आणि सेलिब्रेटी शहनाज गिलनं तिच्या प्रतिक्रियेमध्ये संसदेतील महिला आरक्षणाबाबत दिलेली प्रतिक्रिया नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. एएनआयच्या त्या ट्विटमध्ये शहनाजनं प्रभावीपणे तिची भूमिका मांडली आहे. टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध सेलिब्रेटी म्हणून शहनाज कायम चाहत्यांच्या चर्चेचा विषय राहिली आहे.

Also Read - ‘फेलिचे’ : एका अनोख्या चवीचा प्रवास....

शहनाजनं त्या प्रतिक्रियेमध्ये म्हटले आहे की, मोदींनी जे पाऊल उचलले आहे ते खूपच कौतुकास्पद आहे. त्याचे आपण सर्वांनी स्वागत करायला हवे. आपण जर सर्वांनी योग्य वागणूक आणि योग्य न्याय, समान आदर अशी भावना जपली तर त्याचा सर्वांनाच फायदा होईल. याची सुरुवात आपल्या घरातूनच व्हायला हवी. आपल्या सारखेपणानं वागवलं जातंय याचा आनंद आहे.

मुलीला नेहमीच शिकवलं जातं की, लग्न करायचं आणि संसार करायचा. पण आता मुलींना समान न्यायपद्धतीनं वागवलं जाणं मोठी गोष्ट आहे. त्याचा पुन्हा एकदा नव्या प्रकारे विचार होतो आहे. याचे समाधान आहे. असेही शहनाजनं म्हटले आहे.

Women's Reservation Bill | Actress Shehnaaz Gill says
Jawan BO : गणपती बाप्पा शाहरुखला पावला! गणेश चतुर्थीच्या दिवशी पार केला इतक्या कोटींचा टप्पा

नव्या संसदेचे शहनाजनं कौतुक केलं आहे. भारताचा गौरवशाली इतिहास मांडण्यात आला आहे. आम्ही ते पाहिलं तेव्हा खूप अभिमान वाटला. जे काही केलं ते खूपच प्रभावी करणारं आहे. अशा शब्दांत शहनाजनं तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर नवीन संसद इमारतीध्ये अधिवेशन सुरु झालं. त्यापूर्वी जुन्या इमारतीमध्ये पंतप्रधानांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

Women's Reservation Bill | Actress Shehnaaz Gill says
Shah Rukh Khan: जवानचं यश फॅन्ससोबत साजरं! मन्नतच्या गॅलरीबाहेर येऊन शाहरुख खानने खास अंदाजात मानले आभार

संसदेच्या नवीन इमारतीमध्ये महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आले. या विधेयकाला नारीशक्ती वंदन अधिनियम असं नाव देण्यात आलं असून कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेमध्ये हे बिल सादर केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.