Shekhar Suman News: अभिनेते, निवेदक असलेले शेखर सुमन अलीकडेच बिग बॉस १६ मुळे चर्चेत होते. शेखर सुमनने त्यांच्या खास निवेदनाने बिग बॉस १६ मध्ये प्रत्येक रविवारी प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय.
पण आता याच शेखर सुमनवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शेखर सुमनच्या बहिणीच्या आयुष्यात मोठी घटना घडलीय. त्यामुळे सर्वांना धक्का बसलाय. शेखरचे भावजी २२ दिवसांपासून बेपत्ता आहेत. काय आहे संपूर्ण प्रकरण?
(shekhar suman going patna in search of his brother in law dr. sanjay kumar )
नालंदा मेडिकल कॉलेजमधील NMCH डॉक्टर संजय कुमार बऱ्याच दिवसांपासून बेपत्ता आहेत. आजतागायत त्यांचा शोध लागला नाही. बुधवारी अभिनेता शेखर सुमनने पत्रकार परिषद घेऊन पोलीस प्रशासनाच्या तपास प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
ते म्हणाले की, डॉ.संजय कुमार गेले तेव्हा कुठे गेले? पोलिस तपासात अद्याप खुलासा झालेला नाही. हे प्रकरण थंड पडू नये म्हणून मी मुंबईहून पाटण्याला आलो असल्याचे शेखर सुमन सांगतात.
याशिवाय या संपूर्ण प्रकरणाची CBI मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी विनंती शेखरने पटना राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
या प्रकरणाची कोणतीही माहिती न मिळाल्याने शेखर आणि त्यांचे कुटुंब प्रचंड दुःखी झाले आहेत.
शेखरच्या कुटुंबाचे कुणाशीही शत्रुत्व नाही. परंतु पोलीस अद्याप कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाहीत, याचं शेखर यांना वाईट वाटतंय.
शेखर पुढे म्हणाले.. सर्व कामे सोडून मी मुंबईहून आलो आहे.. जर त्यांनी आत्महत्या केली असली तरी संजय कुमारचा मृतदेह गेला कुठे? पटना पोलीसही त्याचा मृतदेह ताब्यात घेऊ शकत नाहीत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
२२ दिवसांपासून भावजी गायब आहेत तरीही पोलीस प्रशासनाने नीट तपास केला नाही म्हणून शेखर सुमन व्यवस्थेवर नाराज आहेत.
याशिवाय ज्या ठिकाणी डॉ. संजय कुमार गायब झाले त्या गांधी पुलावर एकही CCTV कॅमेरा नाही, याकडे शेखर सुमन यांनी निशाणा साधला.
शेखर सुमनने सांगितले की, नवरा अचानक गायब झाल्यामुळे त्यांच्या बहिणीची प्रकृती खूपच वाईट आहे.
शेखर जेव्हा रात्री बहिणीला भेटले तेव्हा लिफ्टमध्येच त्यांची बहीण प्रचंड दुःख झाल्याने ढसाढसा रडली. शेखर सुमन यांना बहिणीची अवस्था बघवली नाही. त्यांच्याही डोळ्यातून पाणी आलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.