'शेर शिवराज'ची विक्रमी घोडदौड.. भारतासह परदेशातही 'हाऊसफुल्ल'

'शेर शिवराज' या चित्रपटाने तिसऱ्या आठवड्यात पदार्पण केले असून भारतात १००० हुन अधिक आणि परदेशात १०० हुन अधिक शो हाऊसफुल्ल ठरले आहेत.
sher shivraj houseful shows
sher shivraj houseful showssakal
Updated on

Marathi Move : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या आयुष्यावरील वेगवेगळे चित्रपट सध्या चर्चेत आले आहेत. या चित्रपटांची (Entertainment News) निर्मिती करणारे प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांच्यावर कौतुकाचा वर्षावही होतो. शिवअष्टक या चित्रमालिकेतील चौथं पुष्प 'शेर शिवराज' नावाचा चित्रपट प्रदर्शित होऊन आता दोन आठवडे लोटले आहेत. या चित्रपटाची सध्या यशस्वी घोडदौड पाहायला मिळत आहे.

sher shivraj houseful shows
'आधी आपण सगळे भारतीय' बॉलीवूड विरुद्ध साऊथ वादात सई ताम्हणकरची उडी

मध्यंतरी या चित्रपटाला प्राईम टाइम मिळत नसल्याने कलाकारांनी निषेध व्यक्त केला होता. महाराष्ट्रातच मराठी चित्रपटांना प्राईम टाइम मिळत नसल्याची खंत यावेळी अनेकांनी व्यक्त केली होती. पण आता मात्र एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आजूबाजूला हिंदीतील बड्या चित्रपटांची गर्दी असतानाही शेर शिवराज हाऊसफुल्ल ठरतो आहे.

sher shivraj houseful shows
laal singh chaddha : 'या' खास ठिकाणी झाला 'कहाणी' गाण्याचा जन्म.. आमिर खान म्हणाला..

‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’ आणि ‘पावनखिंड’नंतर आता शिव अष्टक संकल्पनेतील ‘शेर शिवराज’ या चित्रपटालाही प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहेत. विशेष म्हणजे मागील तीन चित्रपटांपेक्षा हा चित्रपट वरचढ ठरला आहे. पहिल्या दोन आठवड्यांमध्ये भारतात या चित्रपटाचे १००० पेक्षा अधिक शोज हाऊसफुल झाले, तर परदेशात हा आकडा १०० शोजवर पोहोचला आहे. याबाबत दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांनी स्वतः माहिती दिली असून चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. लवकरच शिव अष्टकातील पाचवे पुष्प म्हणजे 'दिल्लीचे तख्त' आपल्या भेटीला येणार असल्याची शक्यता आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.