Hiajb Row News: कर्नाटकातील हिजाब प्रकरणानं (Hiajb Case) आता देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यावरुन बॉलीवूडमधील (Bollywood News) अनेक सेलिब्रेटींनी प्रतिक्रियाही दिल्या आहे. आतापर्यत गीतकार जावेद अख्तर, अभिनेत्री स्वरा भास्कर, रिचा चढ्ढा, कंगना रनौत यांनी हिजाबवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यानंतर आपल्या बोल्डनेससाठी प्रसिद्ध असणाऱ्या शर्लिननं (Sherlyn Chopra) प्रतिक्रिया दिली आहे. तिनं यावेळी प्रियांका गांधी यांना देखील एक भन्नाट प्रश्न विचारला आहे. त्यामुळे शर्लिनची सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. कर्नाटकामधील शाळेत हिजाब परिधान करण्यावरुन चर्चा सुरु झाली होती. त्यावरुन सध्या मोठा वाद सुरु झाला आहे.
त्याचं झालं असं की, प्रियांका गांधी (Priyanka Gandhi Tweet) यांनी ट्विट केलं होतं की, बिकीनी असो किंवा घुंघट असो किंवा हिजाब हे त्यांनीच ठरवायचं की, आपल्याला काय परिधान करायचं आहे ते. आपल्याला संविधानानं अधिकार दिला आहे. त्यामुळे आपले जे मुलभूत अधिकार आहेत ते आपल्यापासून कुणीही हिरावून घेऊ शकणार नाहीत. गेल्या काही दिवसांपासून संविधानाच्या अधिकारावरच गदा आणण्याचे काम होताना दिसत आहे. महिलांना त्यांच्या मुलभूत अधिकारांवर गदा आणु नका. असे प्रियांका यांनी लिहिलं आहे. त्या व्टिटवर शर्लिननं प्रतिक्रिया दिली आहे. तिची प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे.
शर्लिननं म्हटलं आहे की, मिसेस वाड्रा आपण भारतीय संविधानाची जी व्याख्या केली आहे त्याच्यानुसार खरचं आपल्या देशात महिलांना न्याय मिळतो आहे का, आपण बिकीनीचा प्रश्न उपस्थित केला. त्यावरुन मला असे विचारायचे आहे की, आज शाळांमध्ये बिकीनी परिधान करण्याची परवानगी आहे का, आणि असेल तर कोणती...मायक्रो बिकीनी, सी थ्रु बिकीनी, माझ्याकडे तर खूप साऱ्या आहेत. आणि मला त्या आपल्याला द्यायला आवडतील. असेही शर्लिननं सांगितलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.