Shikhar Dhawan Divorce: 'आयशानं मला खूपच मानसिक त्रास दिला, तिच्यामुळेच मी नेहमीच....' शिखरनं काय म्हटलं होतं याचिकेत?

भारतीय संघात ज्याच्या फलंदाजीचा मोठा दरारा होता त्या शिखर धवनच्या आयुष्यात सध्या मोठं वादळ आलं आहे.
Shikhar Dhawan Ayesha divorce news son zoravar :
Shikhar Dhawan Ayesha divorce news son zoravar :esakal
Updated on

Shikhar Dhawan Ayesha divorce news son zoravar : भारतीय संघात ज्याच्या फलंदाजीचा मोठा दरारा होता त्या शिखर धवनच्या आयुष्यात सध्या मोठं वादळ आलं आहे. त्याला तो त्याच्या स्वभावाप्रमाणे धीरानं सामोरा जाताना दिसत आहे. शिखर आणि आयशा यांच्या वैवाहिक आयुष्यात घडलेली ती घडामोड आता भारतीय क्रिकेट विश्वात मोठी चर्चेची बाब ठरताना दिसत आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर... फॉलो करण्यासाठी या लिंकवर करा क्लिक)

कुणाला त्या गोष्टीबाबत काहीही माहिती नव्हतं. शिखर आणि आयशा यांच्यामध्ये काही आलबेल नाही याविषयी काही बातम्या समोर आल्या होत्या. मात्र त्यांचा घटस्फोट होईल असे कुणाला वाटले नव्हते. शिखरनं तिच्या विरोधात दिल्ली कौटूंबिक न्यायालयात धाव घेतली होती. त्यानं जी याचिका कोर्टासमोर ठेवली त्यात आयशानं आपलं जगणं किती अवघड केलं होतं. त्याबाबत सविस्तरपणे सांगितलं आहे.

Also Read - Penny Stocks : जादा नफ्याच्या मृगजळामागं धावणं नकोच!

मिळालेल्या माहितीनुसार, शिखरचे म्हणणे होते की, आयशानं त्याला सतत मानसिक त्रास देण्याचे काम केले. त्यामुळे त्याचे कशातच लक्ष नव्हते. क्रिकेटपासून दूर होण्याचे कारणही त्यातच होते की काय असा प्रश्न यानिमित्तानं नेटकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे शिखरच्या स्वभावात अधिक आक्रमकपणा येत गेला असेही सांगण्यात येत आहे. सध्या त्याच्या मुलाच्या कस्टडीबाबत एक मोठी बाब समोर आली आहे.

Shikhar Dhawan Ayesha divorce news son zoravar :
Shikhar Dhawan Divorce : प्रसिद्ध क्रिकेटपटू शिखर धवनच्या वैवाहिक नात्याला 'सुरुंग'! घटस्फोट मंजूर, पत्नीकडूनच व्हायचा छळ

शिखरनं तर मुलाची कायमस्वरुपी कस्टडी आपल्याकडे असावी असे म्हटले आहे. न्यायालयानं अद्याप त्या कस्टडीबाबत कोणताही निकाल दिलेला नाही. येत्या काळात त्यावर सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय न्यायालयानं शिखरला काही काळासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियात त्याच्या मुलाला भेटण्याचा आणि व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधण्यास परवानगी दिली आहे.

Shikhar Dhawan Ayesha divorce news son zoravar :
Nana Patekar : नाना पाटेकरांच्या घरी ऋषी कपूर दारुची बाटली घेऊन गेले होते तेव्हा....! काय होता तो भन्नाट किस्सा?

मुलाची शाररिक आणि मानसिक परिस्थिती पाहता यापुढील काळात त्याचा ताबा आपल्याकडेच असावा अशी मागणी देखील शिखरनं केली आहे. त्यानं यावेळी आपली पत्नी आयशाच्या विरोधात एक क्रिमिनल केस असल्याचा उल्लेखही या याचिकेमध्ये केला आहे. जेणेकरुन मुलाचा ताबा आपल्याला मिळेल यासाठी त्यानं ती गोष्ट याचिकेमध्ये नमूद केल्याचे सांगण्यात येत आहे.

शिखर आणि आयशाच्या खटल्यातून काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. जसे की, आयशा ही शिखरला मानसिक त्रास दिल्याचे कोर्टानं मान्य केले आहे. आयशानं सातत्यानं शिखरला त्याच्या मुलापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला. तिनं त्याला कधीच झोरावरला सहजासहजी भेटून दिले नाही. त्यातून तिनं जाणीवपूर्वक मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला. ही बाब कोर्टापुढे निदर्शनास आणून दिली गेली.

Shikhar Dhawan Ayesha divorce news son zoravar :
Jawan SRK Fan Meet: कोणी मिठी मारलं, कोणी पाया पडलं, जवान सुपरहिट झाल्याने शाहरुखचं फॅन्सना खास गिफ्ट

सध्याच्या घडीला हा खटला ऑस्ट्रेलियन कोर्टामध्ये देखील सुरु आहे. त्यात ऑस्ट्रेलियन कोर्टानं धवननं जी याचिका दाखल केली होती. त्यातील अनेक आरोप फेटाळून लावले आहेत. मुलाच्या कस्टडीवरही त्यांनी आक्षेप घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.