Shilpa Shetty आणि हॉलीवूड स्टार रिचर्ड गेरे किंसिंग प्रकरण आठवतंय का?, केसमधून अनेक वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला दिलासा

२००७ साली हॉलीवूड स्टार रिचर्ड गेरेनं एका सार्वजनिक कार्यक्रमात शिल्पा शेट्टीला किस केलं होतं,ज्यावरनं मोठा वाद रंगला होता.
Shilpa Shetty & Richard Gere Kissing case
Shilpa Shetty & Richard Gere Kissing caseInstagram
Updated on

Shilpa Shetty & Richard Gere Kissing case: अभिनेत्री शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर भलतीच चर्चेत असते. वयाची पन्नाशी गाठायला आलेली शिल्पा आपला फिटनेस आणि आयुष्याप्रती नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन घेऊन जगताना दिसते. फिटनेस आणि लाइफस्टाईल मध्ये तर ती आपल्यापेक्षा कमी वयाच्या अभिनेत्रींना काटें की टक्कर देते.

२००७ साली हॉलीवूड स्टार रिचर्ड गेरेनं एका सार्वजनिक कार्यक्रमात अभिनेत्रीला किस केलं होतं. २००७ मधील या किसिंग प्रकरणात शिल्पा शेट्टीला दिलासा देत कोर्टानं आता तिच्या सुटकेविरोधात दाखल केल्या गेलेल्या याचिकेला रद्द केलं आहे.(Shilpa Shetty and hollywood star richard gere kiss case sessions court upholds order discharging actress)

Shilpa Shetty & Richard Gere Kissing case
Janhvi kapoor बॉयफ्रेंडला घेऊन पोहोचली तिरुपती मंदिरात..दाक्षिणात्य पेहरावात देवापुढं माथा टेकताना दिसलं कपल..

मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या आदेशाच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या रिवीजन एप्लिकेशनला सत्र न्यायाधीश एस सी जाधव यांनी रद्द केलं आहे. २००७ एप्रिल मध्ये शिल्पा शेट्टी एका जागरुकता अभियानात सामिल झाली होती. इथे अभिनेत्री गेरेपासून स्वतःला लांब ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसली तरी देखील हॉलीवूड स्टारनं तिनं हात मिळवताच तिला अलिंगन दिलं आणि तिचं चुंबनही घेतलं.

सार्वजनिक ठिकाणी अभिनेत्रीला गेरेनं किस करणं लोकांना मात्र खटकलं. यावरनं खूप मोठा वाद रंगला. त्या दरम्यान शिल्पा देखील खूप चर्चेत आली होती. जयपूर,अलवर आणि गाजियाबादमध्ये अभिनेत्री विरोधात एफआयआर दाखल केली गेली होती.

काही लोकांनी अश्लील आणि देशाच्या संस्कृतीचा यामुळे अपमान झाला अशी ओरड लावली होती. राजस्थानमध्ये गेरे आणि शेट्टीच्या विरोधात आयपीसी आणि सूचना प्रौद्योगिकी अधिनियमाच्या विविध सेक्शन अंतर्गत केस दाखल केली गेली होती. २०१७ मध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर या केसला मुंबईत ट्रान्सफर केलं गेलं होतं.

Shilpa Shetty & Richard Gere Kissing case
Prashant Damle: दामलेंनी करुन दिली बालगंधर्वांची आठवण!, असा रंगला नव्या नाटकाचा पहिला प्रयोग..

जानेवारी २०२२ मध्ये मॅजिस्ट्रेट कोर्टानं शिल्पासोबत गेरेनं गैरवर्तन केलं..ती तर एक पीडित आहे.. असं सांगत अभिनेत्रीला आरोपमुक्त केलं होतं. जेव्हा शिल्पाला किस केलं गेलं तेव्हा तिनं विरोध का केला नाही असा आवाज पु्न्हा उठला. त्यावर आता कोर्टानं म्हटलं की,'तो क्षण काल्पनिक रित्या रंगवून सांगितल जात आहे आणि शिल्पाला त्यात उगाच बळी बनवत अपराधी ठरवलं जात आहे'.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.