मुंबई - बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा shilpa shetty पती बिझनेसमन राज कुंद्रा raj kundra हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्यानं यापूर्वी जामीनासाठी केलेला अर्ज न्यायालयानं फेटाळून लावला. मात्र यासगळ्यात शिल्पाची डोकेदुखी वाढत चालल्याचे दिसून येत आहे. त्याचे कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी तिचीही पोलिसांनी चौकशी केली. तिला समन्सही पाठविण्यात आले होते. दिवसेंदिवस शेट्टी कुटूंबियांसाठी अडचण वाढताना दिसत आहे. पोलिसांनी देखील सखोल तपास करत याप्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा निर्धार केला आहे. त्यांनी न्यायालयाला आमच्याकडे राजच्या विरोधात पुरावे असल्याचे सांगितले होते.
संकट जेव्हा येतं तेव्हा ते आपल्याला चारही बाजुंनी घेरुन टाकल्याशिवाय राहत नाही. असा अनुभव सध्या अभिनेत्री शिल्पाच्या वाट्याला येत असल्याचे दिसत आहे. आता तिला आणि तिच्या आईला कोणत्याही क्षणी अटक होण्याची चिन्हं आहेत. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये आपली प्रतिमा जी मलीन झाली आहे ती सुधारण्यासाठी तिनं न्यायालयात धाव घेतल्याचे दिसुन आले. तेव्हा तिनं काही माध्यमांच्या विरोधात तक्रार केली होती. मात्र न्यायालयानं शिल्पालाच काही प्रश्न विचारत माध्यमांना जर त्यांच्या सुत्रांनी माहिती दिली असेल तर त्यात काही गैर आहे का, या शब्दांत फटकारले होते.
पॉर्न व्हिडिओ pornography तयार करणे आणि ते एका अॅपच्या माध्यमातून व्हायरल करणे यासाठी शिल्पाचा पती राज हा सध्या तुरुंगात आहे. दुसरीकडे शिल्रा आणि तिची आई यांच्यावर आयोसिस वेलनेस सेंटरच्या माध्यमांतून लोकांकडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप काहींनी केला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिल्पा आणि तिची आई यांच्याविरोधात लखनऊमधील हजरतगंज विभुतीखंड पोलीस ठाण्यात दोन तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे संबंधित यंत्रणा त्यांच्या तपासासाठी लवकरच मुंबईत येणार आहे.
सुत्रांनी अशी माहिती दिली आहे की, जर त्या तक्रारीत काही तथ्य असेल आणि पुरावे मिळाल्यास शिल्पा आणि तिच्या आईला अटकही होण्याची शक्यता आहे. शिल्पा ही आयोसिस वेलनेस नावाचे एक सेंटर चालवते. ती या कंपनीची चेअरमन तर तिची आई डायरेक्टर आहे. त्यांच्यावर असा आरोप करण्यात आला आहे की, त्यांनी हे सेंटर सुरु करण्यासाठी लोकांकडून कोट्यवधी रुपये घेतले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.